Sanju Samson and Suryakumar Yadav saam tv
Sports

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

India playing XI prediction for Asia Cup UAE clash आशिया कपमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना संयुक्त अरब अमिरात (यूएई) विरुद्ध आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे कर्णधार असेल. संजू सॅमसन किंवा जितेश शर्मा यांच्यात स्पर्धा आहे, जितेशला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे.

Namdeo Kumbhar

  • आशिया कप २०२५ मध्ये भारताचा पहिला सामना यूएई विरुद्ध खेळला जाणार आहे.

  • सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत.

  • विकेटकीपरपदासाठी संजू सॅमसन व जितेश शर्मा यांच्यात स्पर्धा.

  • जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, शुभमन गिल संघाची ताकद वाढवणार आहेत.

आशिया चषकाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ आजपासून आपल्या अभियानाची सुरूवात करणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील टीम इंडिया आज संयुक्त अरब अमिरात (यूएई) विरोधात पहिला सामना खेळणार आहे. पाकिस्तान विरोधातील सामन्याआधी भारताला संघाचं संतुलन करण्याची ही मोठी संधी असेल. आधीच्याच प्लॅननुसार, भारतीय संघ मैदानात उतरणार असेल तर अष्टपैलू खेळाडूंचा भरणा संघात दिसण्याची शक्यता आहे.

फलंदाजी मजबूत करण्यासाठी भारतीय संघाने अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य दिलेय. आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी असल्याने भारतीय संघ अधिक मजबूत वाटतोय. भारतीय संघाचे कॉम्बिनेशन कसं असेल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. भारतीय संघ फिरकी गोलंदाजांना प्राधान्य देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जसप्रीत बुमराह, शुभमन गिल यांच्यामुळे भारतीय संघाची ताकद आणखी वाढली आहे.

विकेटकीपर कोण?

प्लेईंग ११ मध्ये संजू सॅमसन की जितेश शर्मा, कुणाला संधी मिळणार.. याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संजू सॅमसन वरच्या फळीत फलंदाजी करतो. तर जितेश शर्मा फिनिशंग टच देण्यास सक्षम आहे. शुभमन गिलच्या कमबॅकमुळे सॅमसनची प्लेईंग ११ मधील जागा धोक्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गिल अन् अभिषेक शर्मा डावाची सुरूवात करतील. तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्माने जबरदस्त कामगिरी केली आहे. चौथ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव असेल. त्यामुळे संजू सॅमसनला संधी मिळणं कठीण दिसतेय. जितेश शर्मा याला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

वेगवान गोलंदाज कोण?

भारतासाठी हार्दिक पांड्या हुकमी एक्का असेल. हार्दिक पांड्या मधल्या फळीत वेगात धावा काढण्यात सक्षम आहे. त्याशिवाय वेगवान गोलंदाजाची कमतरता दूर करतो. हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरू शकतो. सहाव्या क्रमांकावर अक्षर पटेल, सातव्या क्रमांकावर जितेश शर्मा फलंदाजीसाठी येऊ शकतो. अक्षर पटेल फिरकी गोलंदाजीसह फलंदाजीतही सक्षम आहे. वेगवान गोलंदाजामध्ये जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह यांचे स्थान निश्चित मानले जातेय. त्याशिवाय वरूण चर्कवर्ती यालाही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

कुलदीप की शिवम...

दुबईमधील खेळपट्टी फिरकीला साथ देणारी आहे. त्यामुळे भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजासह उतरू शकतो, असे म्हटले जातेय. पण आशा स्थितीमध्ये भारताची फलंदाजी सातव्या स्थानापर्यंतच मर्यादीत राहू शकते. त्यामुळे कुलदीप यादव की शिवम दुबे यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार? याची चर्चा सुरू जाली आहे.

भारताची संभाव्य प्लेईंग ११

अभिषेक शर्मा, शुभमान गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती

यूएईः मुहम्मद वसीम (कर्णधार), अलीशान शराफू, राहुल चोपडा (विकेटकीपर), आसिफ खान, मुहम्मद फारूक, हर्षित कौशिक, मुहम्मद जोहेब, मुहम्मद जवादुल्लाह, हैदर अली, जुनैद सिद्दीकी, रोहिद खान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ठाकरेंचा दसरा मेळावा शिवतीर्थावर, तर शिदेंचा वरळी डोममध्ये?

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात श्राद्धाला कावळा शिवला नाही तर काय करावे?

Pune Crime : पुण्यात भयंकर घटना, नराधम बापाचा पोटच्या मुलीवर ४ महिने अत्याचार; स्थानिकांनी फोडून काढलं

Risod Police : दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघेजण ताब्यात, आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Recharge Plan Offer: भारीच! आपल्या प्रियजनांशी मनमुराद बोला! 'या' टेलिकॉम कंपनीची भन्नाट ऑफर

SCROLL FOR NEXT