Ind Vs Pak Asia Cup 2025 Suryakumar Yadav x
Sports

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात सूर्याच्या कृतीने वेधलं लक्ष, भारतीय खेळाडूंना दिला 'हा' संदेश, पाहा Video

Ind Vs Pak Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला सुरु झाला आहे. या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Yash Shirke

  • भारत-पाकिस्तान सामन्याची सुरुवात

  • पाकिस्तानच्या कर्णधाराने टॉस जिंकला

  • भारतीय संघाला प्रथम गोलंदाजी करणार

Asia Cup 2025 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. सामन्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाने टॉस जिंकला आणि भारताला गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. टॉसच्या वेळी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने केलेल्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधले. कॅप्टन सूर्याने नक्की काय केले? जाणून घ्या...

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबई क्रिकेट स्टेडिमयवर खेळला जात आहे. या सामन्यामध्ये टॉसच्या वेळेस सलमान अली आघा आणि सूर्यकुमार यादव हे दोन्ही कर्णधार आमनेसामने आले. सर्वसाधारणपणे टॉसच्या दरम्यान कर्णधार हस्तांदोलन करत असतात. पण सूर्यकुमार यादवने टॉसच्या आधी पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. टॉस झाल्यानंतरही दोन्ही कर्णधारांनी हस्तांदोलन केले नाही. एका प्रकारे सूर्याने निषेध व्यक्त केला असे म्हटले जात आहे.

द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, सामना सुरु होण्याच्या काही तास आधी सूर्यकुमार यादवने 'मी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नाही', हे भारतीय संघाला सांगितले होते. त्याने सकाळीच हा निर्णय घेतला होता. पाकिस्तान क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करण्याबाबत कोणावरही दबाब नाही. खेळाडू स्वतःचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत, असे सूर्याने भारतीय खेळाडूंना सांगितले होते.

काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. यात पाकिस्तानी लष्करी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानवर दबाव टाकायला सुरुवात केली. तेव्हा भारत पाकिस्तान क्रिकेटचे सामने देखील होऊ नये अशी मागणी करण्यात आली. पण तरीही आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले. यामुळे देशात नाराजीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malti Chahar : तान्या मित्तलला रडवणारी मालती चहर आहे तरी कोण?

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याला बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today : सोन्याची ऐतिहासिक घोडदौड, एक तोळ्याची किंमत ₹१२३००० च्या पार, आज कितीने दर वाढले?

Gautami Patil: ज्या गोष्टींमध्ये मी नाही, त्यात मला दोष देऊ नका; गौतमी पाटीलने केली विनंती|VIDEO

Hingoli ZP School : जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाची मनमानी; कारभाराविरोधात शिक्षणाधिकारी शाळेच्या समोर करणार उपोषण

SCROLL FOR NEXT