ind vs uae asia cup 2025 x
Sports

IND Vs UAE : भारताने यूएईचा धुव्वा उडवला, सामना २७ चेंडूंमध्ये संपवला; टीम इंडियाची विजयी सुरुवात

Asia Cup 2025 IND Vs UAE : आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि यूएई हे दोन संघ दुबईतील स्टेडियमवर आमनेसामने आले. या सामन्यामध्ये भारताने यूएईवर सहज विजय मिळवला.

Yash Shirke

IND Vs UAE Asia Cup 2025 : भारत विरुद्ध यूएई हा आशिया कप २०२५ मधील सामना दुबईमध्ये खेळला गेला. या सामन्यामध्ये भारताने यूएईचा दारूण पराभव केला आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. १२ व्या ओव्हरच्या शेवटपर्यंत यूएईचा संघ फक्त ५७ धावांवर ऑलआउट झाला. ५८ धावांचे आव्हान भारताने अवघ्या २७ चेंडूंमध्ये पूर्ण केले.

भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकत यूएईच्या संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. पहिल्या दोन ओव्हर्समध्ये यूएईच्या खेळाडूंनी चांगल्या धावा केल्या. अलिशान शराफू आणि मोहम्मद वसीम यांनी चांगली सुरुवात करवून दिले. शराफू यांनी २२ धावा आणि वसीम यांनी १९ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर यूएईचा संघ पत्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.

भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याच्यापाठोपाठ शिवम दुबेने ३ गडी बाद केले. अक्षर पटेल, वरूण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी १ अशा प्रकारे ३ खेळाडूंना माघारी पाठवले. अवघ्या ५७ धावांवर यूएईच्या संघातील सर्व खेळाडू बाद झाले. त्यानंतर भारताने अवघ्या ४.३ ओव्हर्समध्ये ५८ धावा करत सामना जिंकला.

आशिया कप २०२५ मधील हा भारतीय संघाचा पहिला सामना होता. हा सामना भारताने सहज जिंकला आहे. येत्या रविवारी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला होणार आहे. गतविजेत्या भारतीय संघाने स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ अधिक आत्मविश्वासाने पाकिस्तानशी भिडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT