
इस्रायलच्या जेरुसलेममधील रामोट जंक्शनवर झालेल्या गोळीबारात ५ जण ठार, १५ पेक्षा जास्त जखमी.
दोन हल्लेखोरांना पोलिसांनी ठार केलं; ते वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी असल्याचा अंदाज.
घटनेनंतर जेरुसलेममध्ये सुरक्षाव्यवस्था कडक, पंतप्रधान नेतान्याहू परिस्थितीवर लक्ष ठेवून.
Terror Attack : इस्रायलची राजधानी असलेल्या जेरुसलेममध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शहरातील प्रमुख चौकात झालेल्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात १५-१६ जण जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांना पोलिसांना ठार मारले आहे, अशी माहिती समोर आली आहे. इस्रायली आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रमुख संघटना मॅगेन डेव्हिड अॅडोमने दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांपैकी एकजण ५० वर्षांचा आणि उर्वरित ३० वर्ष या वयोगटातील आहेत.
टाइम्स ऑफ इस्रायलने दिलेल्या वृत्तानुसार, जेरुसलेममधील रामोट जंक्शनवर गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी दहशतवाद्यांना ठार केले. गोळीबार करणारे दहशतवादी हे वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी आहेत. हे दोन्ही दहशतवादी रामल्लाह परिसरातील गावांमधून आल्याचे अंदाज वर्तवला जात आहे. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नसून त्याबाबत शोध सुरु आहे.
मॅगेन डेव्हिड अॅडोम येथील पॅरामेडिक नदाव तैयब यांनी गोळीबाराच्या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, 'गोळीबाराबाबत समजल्यानंतर आम्ही मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. आम्ही पोहोचलो तेव्हा रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला आणि बस स्टॉपजवळील फूटपाथवर लोक बेशुद्ध पडलेले होते. खूप नासधूस झाली होती. जमिनीवर तुटलेल्या काचा विखुरल्या होत्या. घटनास्थळी मोठा गोंधळ झाला होता. आम्ही जखमींना मदत करण्यास सुरुवात केली.'
गोळीबाराच्या घटनेनंतर पंतप्रधान कार्यालयाने निवेदन सादर केले. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हल्ल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सुरक्षा दलांनी जेरुसलेमकडे जाणारे आणि येणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. या हल्ल्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध इस्रायली सरकार घेत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.