Nepal : फेसबुक-X-यूट्यूबवर बंदी, तरूणांचा जमाव थेट संसदेत, गोळीबारात एकाचा मृत्यू, ८० जण जखमी | Video

Nepal Protest : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातल्याने नेपाळमध्ये आंदोलन सुरु झाले आहे. सरकारच्या विरोधात काठमांडूमध्ये तरुणांनी मोठी गर्दी केली आहे. या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे.
Nepal Kathmandu Protest
Nepal Kathmandu Protestx
Published On
Summary
  • नेपाळमध्ये फेसबुक, एक्स, यूट्यूबसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली.

  • या बंदीविरोधात काठमांडूत तरुणांचे आंदोलन हिंसक झाले आहे.

  • संसदेत घुसखोरी, पोलिसांचा लाठीचार्ज व गोळीबार झाल्याचे समोर आले आहे.

  • एकाचा मृत्यू, ८० हून अधिक जखमी; काठमांडूत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

Nepal Kathmandu Protest : फेसबुक, एक्स, व्हॉट्सॲप अशा सोशल मीडिया माध्यमांवर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या बंदीच्या विरोधात हजारो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. नेपाळची राजधानी काठमांडूच्या रस्त्यांवर आंदोलन सुरु आहे. आंदोलनकर्त्यांनी नेपाळच्या संसदेच्या परिसरात प्रवेश केला. वाढती गर्दी पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याचा फवारणा केला. सध्या काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नेपाळच्या सरकारने आपत्कालीन सुरक्षा बैठक बोलावली आहे. त्यादरम्यान काठमांडूमध्ये रात्री १० वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला आहे. कर्फ्यूअंतर्गत चार जिल्ह्यांमध्ये घराबाहेर पडणे, कोणत्याही प्रकारचे मेळावा, मिरवणूक, निदर्शने, मेळावा, बैठक किंवा घेराव घालण्यास बंदी आहे. या निदर्शनामध्ये एकाचा मृत्यू झाला असून ८० जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे आंदोलन हिंसक होत चालले असल्याचे म्हटले जात आहे.

नेपाळ सरकारने ४ सप्टेंबर रोजी फेसबुक, एक्स, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. सरकारकडे नोंदणीकृत नसल्याने या प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहे. नेपाळमध्ये २०२४ मध्ये नवा कायदा लागू करण्यात आला. या अंतर्गत सर्व सोशल मीडिया कंपन्यांना नेपाळमध्ये कामकाजासाठी स्थानिक कार्यालये स्थापन करणे आणि करदाते म्हणून नोंदणी करणे बंधन घालण्यात आले.

Nepal Kathmandu Protest
Helicopter Crash : भीषण! हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले अन् आगीचा भडका उडाला, सर्व प्रवासी ठार; VIDEO

सरकारच्या नियमांचे पालन न केल्याने बंदी घातल्याचे म्हटले जात आहे. हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे असे मानत अनेकांनी या बंदीवर टीका केली आहे. ही बंदी राजेशाही समर्थकांच्या निदर्शनांना आणि सरकारविरोधी भावनांना दडपण्याचा प्रयत्न असू शकते असेही मानले जात आहे. २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातल्यानंतर ८ सप्टेंबरपासून जनरल-झेड रिव्होल्यूशनच्या नावाखाली निषेध सुरु झाला आहे. बंदीमुळे नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ होऊ शकते असेही म्हटले जात आहे.

Nepal Kathmandu Protest
Prime Minister Resign : पंतप्रधानांचा राजीनामा, सत्ताधारी पक्षात फूट पडू नये म्हणून घेतला मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com