
अमेरिकेच्या मिनेसोटामध्ये रॉबिन्सन R66 हेलिकॉप्टर कोसळून भीषण आग लागली.
अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला.
पोलिस आणि अग्निशमन दलाने बचाव कार्य सुरु केले असून तपास सुरू आहे.
Helicopter Accident : अमेरिकेतील मिनेसोटा येथील ट्विन सिटीज परिसरामध्ये काल (६ सप्टेंबर) विमानतळाजवळ हेलिकॉप्टर कोसळून मोठी आग भडकली. या दुर्घटनेमध्ये हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची ओळख रॉबिन्सन आर६६ अशी झाली आहे. हे हेलिकॉप्टर एअरलेक विमानतळाच्या पश्चिमेला कोसळले. स्थानिक वेळेनुसार, दुपारी अडीच पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरु केले. पण त्याआधीच हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर लागलेल्या आगीत हेलिकॉप्टर पूर्णपणे जळून खाक झाले. अपघातात हेलिकॉप्टरमधील एकही प्रवासी वाचला नाही. त्यात किती लोक हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनास्थळी दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी तपास सुरु केल्याचे म्हटले जात आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. अपघात स्थळ हे निवासी आणि व्यावसायिक कंपन्या असलेल्या ठिकाणांपासून लांब आहे, अपघात झालेल्या ठिकाणी जमिनीवर कोणीही जखमी झाल्याचे कोणतेही चिन्ह नव्हते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
रॉबिन्सन आर ६६ हेलिकॉप्टर
रॉबिन्सन आर ६६ हे रॉबिन्सन हेलिकॉप्टर कंपनीने डिझाइन केलेले एक हलके, सिंगल-इंजिन टर्बाइन हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टरला काचेचे कॉकपिट आणि अत्याधुनिक एव्हियोनिक्स सिस्टम आहे. यामुळे उड्डानादरम्यान पायलटला मदत होते. या हेलिकॉप्टरची कमाल उड्डाण क्षमता तब्बल ३५० मैल आहे. हे हेलिकॉप्टर २४,५०० फूट उंचीपर्यंत उडू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.