Asia Cup 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संघर्ष पाहायला मिळाला. फक्त मैदानातच नाही तर मैदानाबाहेरही भारत-पाकिस्तान यांच्यात गरमागरमी असल्याचे दिसले. याला सुरुवात १४ सप्टेंबरच्या सामन्यात हँडशेक प्रकरणावरुन झाला. हा संघर्ष आशिया कपच्या अंतिम सामन्यामध्येही दिसला.
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा टॉससाठी मैदानात आले. सूर्याने नाणं फेकत टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करणार असल्याचे सांगितले. टॉसदरम्यान सूर्याने सलमान आगाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. हँडशेक करणे तर नाहीच भारतीय कर्णधाराने पाकिस्तानच्या कर्णधाराकडे पाहिलेही नाही.
टॉस जिंकून सूर्यकुमार यादवने भारतीय संघ गोलंदाजी करणार असल्याचे सांगितले आणि तो थेट डगआउटमध्ये गेला. फक्त सूर्यकुमार यादवच नाही तर रवी शास्त्री देखील पाकिस्तानच्या कर्णधाराकडे पाहिले नाही. रवी शास्त्री सहसा टॉसच्या वेळेस दोन्ही कर्णधारांशी बोलतात पण यावेळेस त्यांनी सलमान आघाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसले.
१४ सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हँडशेक करणे टाळले होते. त्यानंतर या प्रकरणावरुन पाकिस्तानच्या संघाने गोंधळ घातला. पाकिस्तानने आयसीसीसमोर रडारड करायला सुरुवात केली. पीसीबीने आयसीसीकडे यावरुन तक्रार केली, पण हँडशेक बद्दल काही नियम नसल्याने त्यांना आयसीसीने पाकिस्तानची तक्रार अमान्य केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.