Eknath Shinde: '...ते एकनाथ शिंदेंचे विमान पाडणार होते', राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Rohit Pawar On Eknath Shinde: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात चौथी पत्रकार परिषदेत घेत अनेक खळबळजनक दावे केले. यावेळी त्यांनी '...ते एकनाथ शिंदेंचे विमान पाडणार होते.', असा दावा केला.
Eknath Shinde: '...ते एकनाथ शिंदेंचे विमान पाडणार होते', राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
Deputy CM Eknath Shinde Saam Tv
Published On

Summary -

  • रोहित पवारांनी एक खळबळजनक दावा केला

  • दावोस दौऱ्यावेळी एकनाथ शिंदेंचे विमान ते पाडणार होते असे ते म्हणाले

  • ओव्हरफ्लाईट परवानगी नसल्यामुळे विमान पाडण्याचा इशारा मिळाल्याचा आरोप

  • व्हीएसआर कंपनीवर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप त्यांनी केले

'इराण एकनाथ शिंदेंचं विमान पाडणार होतं', असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला. व्हीएसआर कंपनीच्या विमानाने एकनाथ शिंदे दावोसला जात होते. तेव्हा त्या विमानाने इराणच्या हद्दीत प्रवेश केला होता, ज्यामुळे शिंदेंचा जीव धोक्यात आला होता, असं रोहित पवारांनी सांगितलं. रोहित पवारांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीवर अनेक गंभीर आरोप देखील केले.

आमदार रोहित पवार यांनी आज अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात चौथी पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक दावे केले. यावेळी रोहित पवार यांनी अजित पवारांसोबत जे घडलं तसाच प्रकार एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणार होता का? असा प्रश्न उपस्थित केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना २०२३ मध्ये दावोस दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्याचा उल्लेख करत रोहित पवारांनी मोठं विधान केले. व्हीएसआर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे परदेशात शिंदेंचे विमान पाडले गेले असते, असे विधान त्यांनी केले आहे.

Eknath Shinde: '...ते एकनाथ शिंदेंचे विमान पाडणार होते', राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
Rohit Pawar: VSR कंपनीला राजकीय नेत्यांचं पाठबळ, रोहित पवारांचा गंभीर आरोप | VIDEO

रोहित पवार म्हणाले की, '१६ ते २० जानेवारी २०२३ या काळामध्ये एकनाथ शिंदे आणि भूषण गगराणी व्हीएसआर कंपनीच्या विमानाने दावोसला गेले होते. या विमानामध्ये अमित शुक्ला पायलट इन कमांड होते. मुंबईतून या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर इंधन भरण्यासाठी पहिल्यांदा ते बहरीन येथे थांबले होते. त्यानंतर या विमानाने बहरीन येथून उड्डाण घेतलं. हे विमान इराणच्या हवाई क्षेत्रातून जात होते. त्यावेळी ओव्हरफ्लाईट परवानगी नसल्यामुळे या विमानाला परत जाण्याचे आदेश देण्यात आले. नाही तर ईराणी लढाऊ विमानांकडून ते विमान पाडले जाईल असा इशारा देण्यात आला होता.'

Eknath Shinde: '...ते एकनाथ शिंदेंचे विमान पाडणार होते', राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
Raj Thackeray Meets Eknath Shinde: २० मिनिटांच्या भेटीत ठरली मोठी राजकीय डील? एकनाथ शिंदेंच्या भेटीमागील 'राज'कारण आलं समोर

तसंच, 'इराणच्या धमकीनंतर या विमानाने मार्ग बदलला. या विमानाने इराकच्या हवाई क्षेत्रातून जाण्याचा निर्णय घेण्यात आला. पण तिथे सुद्धा हवाई क्षेत्र सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. इराणसोबत इराकनेही हे विमान पाडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर इंधन कमी असल्याने ते विमान परत बहरीनला आले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत ही कंपनी असा प्रकार करते यावरून ती किती बेजबाबदारपणे वागत आहे हे लक्षात येते.' , असे रोहित पवार यांनी सांगितले.

Eknath Shinde: '...ते एकनाथ शिंदेंचे विमान पाडणार होते', राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
Eknath Shinde: दुबईत अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक मायदेशी परतणार, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विशेष विमानाची व्यवस्था

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com