Asia Cup 2025 Final  x
Sports

Asia Cup 2025 Final : पॉवर प्लेमध्ये दुबे, बुमराहकडून गोलंदाजी! फायनलसाठी खास 'प्लान', भारताचा प्रयोग यशस्वी होणार?

IND Vs PAK Asia Cup 2025 Final : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाने प्लेईंग ११ मध्ये प्रयोग केला आहे.

Yash Shirke

Asia Cup 2025 मधील अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा यांना प्लेईंग ११ मध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यांच्या जागी जसप्रीत बुमराह, रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांना संधी देण्यात आली आहे. शिवम दुबेने सामन्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजी देखील केली.

भारत विरुद्ध पाकिस्तान या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाने प्रयोग केल्याचे पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेमध्ये जसप्रीत बुमराहला फलंदाजी करण्याचा भारतीय संघाचा प्लान आहे. जसप्रीत बुमराहला वेगवान गोलंदाजीमध्ये शिवम दुबेची मदत करताना दिसला, त्याच्यामुळे रिंकू सिंहला प्लेईंग ११ मध्ये जागा मिळाली. याव्यतिरिक्त भारतीय संघामध्ये वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंना संधी देण्यात आली आहे.

प्रामुख्याने बुमराह सामन्याच्या सुरूवातीला एका ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतो. तो शेवटच्या ओव्हर्समध्ये प्रामुख्याने गोलंदाजी करतो. पण या सामन्यामध्ये तो पॉवर प्लेमध्ये ३ ओव्हर्स गोलंदाजी करणार आहे. त्याने २०१६ मध्ये सामन्याच्या पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी केली होती. भारतीय संघाकडून करण्यात आलेला हा प्रयोग किती यशस्वी होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बुमराह व्यतिरिक्त आणखी काही प्रयोग भारतीय संघाने केले आहेत. भारतीय संघाने सुरुवातीला शिवम दुबेला गोलंदाजी करण्यासाठी पाठवले. आशिया कप २०२५ मध्ये रिंकू सिंहने एकही सामना खेळला नाही. आता त्याला अंतिम सामन्यात प्लेईंग ११ मध्ये संधी देण्यात आली आहे. रनचेज करण्यासाठी भारतीय संघाने हा प्लान केल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : 'कॅबिनेटला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाका'; ठाकरे सेनेचा सत्ताधाऱ्यांवर संताप, VIDEO

Suryakumar Yadav आउट की नॉट आउट? चेंडूचा जमिनीला स्पर्श झाला होता का? Video

India vs Pakistan : पाकिस्तानने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं; भारताचे ३ तगडे फलंदाज तंबूत परतले

IND Vs PAK Final सामन्यात राडा! जसप्रीत बुमराह संतापला अन् साहिबजादा फरहानला भिडला, नक्की काय घडलं? VIDEO

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंविरोधात भाजपमध्ये नाराजी,माजी नगरसेवक करणार फडणवीसांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT