IND Vs Pak Asia Cup 2025 Final  x
Sports

Asia Cup 2025 Final जिंकण्यासाठी 'त्याला' संधी द्याच, IND vs Pak सामन्याआधी दिग्गजाची मोठी मागणी

IND Vs Pak Asia Cup 2025 Final : दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये आशिया कप २०२५ मधील अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत.

Yash Shirke

  • आशिया कप फायनलमध्ये अर्शदीप सिंहला संधी द्यावी, अशी आर. अश्विनची मागणी.

  • श्रीलंकेविरुद्ध अर्शदीपने सुपर ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती.

  • हार्दिक पंड्याच्या दुखापतीमुळे अर्शदीपच्या खेळण्याची शक्यता वाढली आहे.

IND Vs Pak : आशिया कप २०२५ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान या अंतिम सामन्याला अवघे काही तास शिल्लक आहेत. सामना जिंकून आशिया कप कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सामन्यासाठी भारताच्या प्लेईंग ११ मध्ये अर्शदीप सिंहचा समावेश करण्याची मागणी रविचंद्रन अश्विनने केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सुपर ओव्हरमध्ये अर्शदीपने क्षमता सिद्ध केली होती. त्याने दोन धावा देत दोन विकेट्स घेतल्या होत्या. पण जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या हे मुख्य वेगवान गोलंदाज असल्याने अर्शदीप सिंहला भारताच्या प्लेईंग ११ मध्ये समाविष्ट होण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात अर्शदीपने खेळले पाहिजे. मी चष्मा लावूनही हेच सांगेन! जरी तुम्ही मला गाढ झोपेतून उठवले तरी माझे उत्तर बदलणार नाही. सहा महिन्यात विश्वचषक आहे, विश्वचषकासाठी अर्शदीपच्या फलंदाजीवर काम करा, वरुण चक्रवर्तीच्या फलंदाजीवर काम करा, बुमराह फलंदाजी करु शकतो. फलंदाजी प्रशिक्षकाने या खेळाडूंवर काम करण्याची गरज आहे, असे आर. अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हटले आहे.

श्रीलंकेविरुद्ध सामन्यात अर्शदीपने ज्या प्रकारे गोलंदाजी केली, त्याने कृतीतून पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले. जर हार्दिक पंड्या खेळला नाही, तर भारताने अर्शदीप सिंहला संधी द्यावी. भारतासाठी हार्दिक आवश्यक आहेच. पण जर दुखापतीमुळे तो बाहेर असेल, तर अर्शदीपला खेळवता येईल. भारतासाठी तो किती महत्त्वाचा गोलंदाज आहे हे तो पुन्हा एकदा दाखवून देईल असे वक्तव्य अर्शदीप सिंहने केले.

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यामध्ये हार्दिक पंड्याला दुखापत धाली आहे. त्याच्या मांडीला दुखापत झाल्याचे म्हटले जात आहे. या दुखापतीमुळे तो आजच्या (२८ सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात खेळेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर हार्दिक उपलब्ध नसेल, तर त्याच्या जागी अर्शदीप सिंहला संधी मिळू शकते असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई - गोवा महामार्गावर, माणगावमध्ये वाहतूक कोंडी|VIDEO

Maharashtra Live News Update: जालन्यातील गोदाकाठच्या गावातील नागरिकांचे स्थलांतर

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचा हॉट अंदाज, फोटोशूट पाहून नेटकरी घायाळ

Team India च्या क्रिकेटपटूंना ED चा दणका! मनी लाँड्रिंग प्रकरणी मालमत्ता जप्त, कोणा-कोणावर कारवाई?

Dahanu Tourism : डहाणूला गेल्यावर 'हे' निसर्गरम्य ठिकाण पाहाच, पुन्हा पुन्हा जावंसं वाटेल

SCROLL FOR NEXT