Asia Cup 2022 India vs Pakistan Virat Kohli Practice/@BCCI/twitter SAAM TV
क्रीडा

India vs Pakistan : पाकिस्तानला भिडण्याआधीच विराट कोहलीची स्पेशल ट्रेनिंग; पाहा व्हिडिओ

आशिया चषक २०२२ मध्ये सुपर ४ मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे.

Nandkumar Joshi

India vs Pakistan, Asia Cup 2022 | मुंबई: आशिया चषक २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान हायव्होल्टेज सामना पुन्हा होणार आहे. पाकिस्ताननं शुक्रवारी हाँगकाँगला पराभूत केल्यानंतर आशिया चषक स्पर्धेच्या सुपर ४ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं. त्यामुळं या स्पर्धेत पुन्हा भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने येणार हे नक्की झालं.

२८ ऑगस्टलाच भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यात लढत झाली होती. या सामन्यात भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं होतं. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. या लढतीआधीच भारताचा माजी कर्णधार आणि फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) खास तयारी केली आहे. त्यानं स्पेशल ट्रेनिंग घेतली आहे.

विराट कोहलीचा फलंदाजीचा सूर हरवला असला तरी, तो आता पुन्हा आपल्या पूर्वीच्या लयीत येत आहे. त्याचा फिटनेस हीच त्याची जमेची बाजू आहे. हाच फिटनेस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय. कोहलीनंच टीम इंडियात फिटनेसला महत्व प्राप्त करून दिलं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सध्याच्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक फिट असलेला खेळाडू म्हणून विराट कोहलीकडं पाहिलं जातं. आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी विराट कोहलीनं कसून सराव केला. तो मैदानावर सराव करताना घाम गाळताना बघायला मिळाला. त्यानं स्पेशल अशी ट्रेनिंग घेतल्याचे दिसते.

विराट कोहली सराव करताना स्प्रिंट्स लावताना दिसला. तसेच स्पेशल मास्क घालून तो धावताना दिसला. कोहलीने घातलेला हा मास्क हाय एल्टिट्युड मास्क होता. ज्यात ऑक्सिजनचा पुरवठा खूप कमी प्रमाणात आतमध्ये होतो. खासकरून टेकड्यांवर ट्रेकिंग करणारे अशा प्रकारचा मास्क घालतात. या सरावावेळी विराटसोबत फिजिकल ट्रेनर सोहम देसाई सुद्धा होते. ते त्याला मार्गदर्शन करत होते.

पाकिस्तानविरुद्ध करणार कमाल

कोहलीने आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध खेळताना मोठी खेळी केली नाही. त्याने ३५ धावा केल्या. हाँगकाँगविरुद्ध कोहली पुन्हा आपल्या लयीत दिसला. त्याने अर्धशतकी खेळी केली.

बऱ्याच कालावधीनंतर विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक ठोकलं आहे. कोहलीने पाकिस्तानविरुद्ध चांगली खेळी करावी, त्याच्या बॅटमधून धावा निघाव्यात अशी अपेक्षा टीम इंडियाला आहे. कोहलीने आशिया चषक स्पर्धेआधी मोठा ब्रेक घेतला होता. वेस्टइंडीज दौऱ्यावरही तो गेला नव्हता. त्यानंतरच्या झिम्बॉब्वे दौऱ्यातही तो खेळला नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : आष्टीत पोस्टल मतदानात दबावतंत्र; राम खाडे यांचा आरोप, निवडणूक विभागाकडे तक्रार

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT