Virat Kohli: विराट कोहली झाला अलिबागकर! गणपतीच्या मुहूर्तावर झिराडजवळ घेतली ८ एकर जमीन

Virat Kohali Latest News | सहा महिन्यांपूर्वी विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांनी झिराड येथे येऊन जागेची पाहणी केली होती.
Virat Kohli and Anushka Sharma
Virat Kohli and Anushka Sharma Saam TV
Published On

सचिन कदम

अलिबाग: भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. अलिबाग (Alibaug) तालुक्यातील झिराड परिसरात ही ८ एकर हवेशीर जागा असून येथे तो फार्महाऊस बांधणार आहे. विराटचा भाऊ विकास कोहली याने हा व्यवहार गणपतीच्या आदल्या दिवशी मंगळवारी ३० ऑगस्टला पूर्ण केला. सहा महिन्यांपूर्वी विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांनी झिराड येथे येऊन जागेची पाहणी केली होती. (Virat Kohli and Anushka Sharma Latest News)

हे देखील पाहा -

३० ऑगस्टला या ८ एकर जमीन खरेदी-विक्रीची कागदपत्रे अलिबाग येथील सह दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणीकृत केली. या जमिनीची एकूण किंमत १९ कोटी २४ लाख ५० हजार रुपये असून यासाठी त्याने ३ लाख ३५ हजार रेडीरेकनरनुसार १ कोटी १५ लाख ४५ हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी सरकारच्या तिजोरीत जमा केली. क्रिकेट विश्वातील दिग्जांमध्ये रवी शास्त्री, रोहीत शर्मा यांच्या पाठोपाठ आता विराट कोहलीही अलिबागकर होणार आहे.

Virat Kohli and Anushka Sharma
Video: तुफान राडा! पापडासाठी लग्नात भिडले वऱ्हाडी; एकमेकांच्या जीवावर उठले

अलिबागकर झालेले भारतीय खेळाडू

रवी शास्त्री, रोहीत शर्मानंतर आता विराटही अलिबागकर झाला आहे. यात रवी शास्त्रीने १० वर्षांपूर्वीच अलिबागमध्ये घर बांधलंय. तर म्हात्रोळी-सारळ परिसरात रोहितने ३ एकरमधील फार्महाऊसचे काम चालू आहे, अशी माहिती बांधकाम करणाऱ्या अमित नाईक यांनी दिली. याव्यतिरिक्त हार्दीक पंड्या, युजवेंदर चहल हेदेखील काही दिवसांपासून जागेचा शोध घेत अलिबागमध्ये पोहचले होते. यावरुन क्रिकेट, सिनेकलाकार, उद्योजकांची अलिबागला असणारी पसंती दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com