Asia cup: आशिया चषकावर आठव्यांदा नाव कोरण्यासाठी टीम इंडिया सज्ज; यंदा 'हे' विक्रम मोडण्याची नामी संधी

आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेट संघ आठव्यांदा चषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. तर यंदा भारतीय क्रिकेट संघाला (India) अनेक नवे विक्रम नावावर करण्याची मोठी संधी आहे.
Asia cup news
Asia cup news saam tv
Published On

नवी दिल्ली : आशिय कप स्पर्धेची सुरुवात २७ ऑगस्ट रोजी होणार असून पहिलाच सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंकेदरम्यान होणार आहे. दोन्ही संघाचा हा सामना दुबईच्या आतंरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात होणार आहे. तर दुसरा सामना २८ ऑगस्ट रोजी सख्खे शेजारी आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. या आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेट संघ आठव्यांदा चषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. तर यंदा भारतीय क्रिकेट संघाला (India) अनेक नवे विक्रम नावावर करण्याची मोठी संधी आहे.

Asia cup news
'आम्ही घाबरणार नाही..', रोहित शर्माने पाकविरुद्धच्या विजयाचा सांगितला फॉर्म्युला

आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा सुरुवातीपासून दबदबा आहे. भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत सात वेळा आशिया चषकावर नाव कोरलं आहे. आता भारताला आठव्यांदा आशिया कप जिंकण्याची नामी संधी आहे. आशिया कपचे मागील दोन सत्र हे भारतीय क्रिकेट संघाने जिंकले आहेत. भारत क्रिकेट संघाने १९८४ साली आशिया कपच्या पहिल्या सत्रात श्रीलंकेचा अंतिम सामन्यात पराभव करत चषकावर नाव कोरलं होतं.

आशिया कपच्या भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवर फलंदाज दुसऱ्यांदा संघाचं नेतृत्व करत आहे. रोहितने या आधी २०१८ साली भारताचं नेतृत्व करत अंतिम सामन्यात बांग्लादेशला पराभवाची धूळ चारली होती. दरम्यान, आशिया कपमध्ये दुसऱ्यांदा संघाचं नेतृत्व करणारा कोणाताही कर्णधाराला चषक जिंकण्याचा विक्रम करता आला नाही. तसेच या आशिया कपमध्ये रोहित शर्माने ८९ धावा पूर्ण केल्यावर आशिया कपच्या इतिहासात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरणार आहे. रोहितने ८९ धावा केल्यामुळे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडता येणे शक्य होणार आहे.

Asia cup news
Virat Kohli : तुझ्या फॉर्मसाठी प्रार्थना करतोय, पाकिस्तानचा 'हा' खेळाडू विराट कोहलीला काय म्हणाला?

दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने केवळ दोन टी-20 सामने जिंकल्यास विराट कोहलीचा सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम मोडला जाणार आहे. त्यानंतर रोहित शर्मा टी-20 फॉरमॅटमधील भारताचा यशस्वी कर्णधार ठरणार आहे. तर टी-20 फॉरमॅटमध्ये माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने देशासाठी ४१ सामने जिंकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com