arshdeep singh  saam tv
Sports

Arshdeep Singh Record: अर्शदीप सिंगने रचला इतिहास! असा कारनामा करणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

India vs Ireland 2nd T20I: भारतीय संघातील युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने इतिहासाला गवसणी घातली आहे.

Ankush Dhavre

Arshdeep Singh Record In IND vs IRE 2nd T20I:

भारतीय संघातील युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने इतिहासाला गवसणी घातली आहे. रविवारी भारत विरूद्ध आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये दुसरा टी-२० सामना पार पडला.

या सामन्यात अर्शदीप सिंगने ४ षटक गोलंदाजी करत २९ धावा करत १ गडी बाद केला. यासह त्याने असा काही विक्रम केला आहे जो जसप्रीत बुमराहला देखील करता आला नव्हता.

अर्शदीप सिंग आता भारतीय संघांसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. अर्शदीप सिंगने आपल्या ३३ व्या टी-२० सामन्यात हा कारनामा करून दाखवला आहे. तो आता सर्वात जलद ५० गडी बाद करणारा वेगवान गोलंदाज आहे. तसं पाहायला गेलं तर भारतीय संघासाठी सर्वात जलद ५० गडी बाद करण्याचा विक्रम हा कुलदीप यादवच्या नावे आहे. कुलदीप यादवने आपल्या ३० व्या सामन्यात हा कारनामा केला होता.

असा कारनामा करणारा ठरला पहिलाच गोलंदाज..

युवा अर्शदीप सिंगने या बाबतीत अनुभवी जसप्रीत बुमराहला देखील मागे सोडलं आहे. अर्शदीप सिंगने हा कारनामा ३३ व्या सामन्यात करून दाखवला आहे. तर जसप्रीत बुमराहने हा कारनामा आपल्या ४१ व्या सामन्यात केला होता. कुलदीप यादवने ३० व्या सामन्यात तर युजवेंद्र चहलने ३४ व्या सामन्यात ५० गडी बाद केले होते. भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम युजवेंद्र चहलच्या नावे आहे. त्याने आतापर्यंत ९६ गडी बाद केले आहेत. तर भुवनेश्वर कुमारने ९० आणि जसप्रीत बुमराहने ७४ गडी बाद केले आहेत. (Latest sports updates)

भारतीय संघासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० गडी बाद करणारे गोलंदाज..

कुलदीप यादव - ३० सामने

अर्शदीप सिंग - ३३ सामने

युजवेंद्र चहल - ३४ सामने

जसप्रीत बुमराह -४१ सामने

आर अश्विन - ४२ सामने

भुवनेश्वर कुमार - ५० सामने

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT