Arjun Tendulkar  SAAM TV
क्रीडा

Arjun Tendulkar Last Over: शेवटच्या षटकात अर्जुन तेंडुलकरने फिरवला गेम! दिग्गजांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

Giants Praise Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरच्या या उत्कृष्ट गोलंदाजीचे क्रिकेट विश्वानेही कौतुक केले आहे.

Chandrakant Jagtap

Arjun Tendulkar Last Over vs SRH : मुंबई इंडियन्समध्ये सध्या ज्युनियर तेंडुलकर त्याच्या खेळाचा आनंद घेत आहे. ज्युनियर तेंडुलकर म्हणजेच अर्जुन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीतील दुसऱ्या आयपीएल सामन्यात कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली.

यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने हैदराबादविरुद्ध सामन्यात त्याने शेवटचे षटक टाकले निर्णायक आणि संघाला विजय मिळवून दिला. या षटकात अब्दुल समद फलंदाजीला असताना त्याने हैदराबादला 20 धावा करू दिल्या नाहीत. या षटकात त्याने केवळ 5 धावा दिल्या, एक विकेट घेतली आणि संघाला 14 धावांनी विजय मिळवून दिला.

अर्जुन तेंडुलकरच्या या उत्कृष्ट गोलंदाजीचे क्रिकेट विश्वानेही कौतुक केले आहे. ज्युनियर तेंडुलकरच्या या उत्कृष्ट षटकाचे सर्व अनुभवी खेळाडूंनी कौतुक केले. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, इयान बिशप आणि इरफान पठाण यांनी अर्जुचं कौतुक केलंय.

वीरेंद्र सेहवाग म्हणाला, 'अर्जुनला चांगली कामगिरी करताना पाहून मला खूप आनंद झाला. सचिन तेंडुलकरला आज अभिमान वाटत असेल. अर्जुनच्या मेहनतीचे फळ मिळत आहे आणि मी प्रार्थना करतो की भविष्यातील मोठ्या गोष्टींची ही फक्त सुरुवात आहे. शाब्बास अर्जुन'.

मोहम्मद कैफने लिहिले की, 'अर्जुन तेंडुलकरचा आत्मविश्वास आज आणखी वाढला आहे. शेवटचे षटक टाकून तो कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. त्याने त्याची पहिली आयपीएल विकेटही घेतली. पाजीचे (सचिन तेंडुलकर) अभिनंदन. अर्जुनच्या दीर्घ यशस्वी कारकिर्दीसाठी मी प्रार्थना करतो.'

वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज इयान बिशपने लिहिले की, 'अर्जुन तेंडुलकरचे हे शेवटचे षटक शानदार होते. हा त्याचा दुसरा सामना होता पण त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. हे त्याच्यासाठी शानदार होते'. (IPL 2023)

इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने अर्जुन तेंडुलकरचं कौतुक केले आहे. त्याने ट्वीटवर अर्जुनचा व्हिडिओ शेअर करत लिहिले 'उत्तम कामगीरी.'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज इरफान पठाणनेही अर्जुनचं कौतुक केलंय. इरफानने लिहिले की, 'युवा तेंडुलकरचा शांत स्वभाव पाहून खूप छान वाटले'.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर मुंबई इंडियन्सने येथे प्रथम फलंदाजी करताना 192 धावा केल्या होत्या. हेनरिक क्लासेनच्या 16 चेंडूत 36 आणि मयंक अग्रवालच्या 41 चेंडूत 48 धावांच्या खेळीमुळे सनरायझर्स संघ लक्षाच्या जवळ पोहोचला होता. मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत विकेट उरल्या नसल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. (Latest Sports News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court: अल्पवयीन मुलींशी लग्न करून शरिरसंबंध ठेवणं बलात्कारच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Jhansi Hospital Fire : झाशींमध्ये हाहा:कार! रुग्णालयात १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू

IQ Test: मधमाशांच्या मोहोळात लपलीये एक मुंगी; शोधण्यासाठी तुमच्याकडे आहेत केवळ १० सेकंद

Viral Video: फालतू शायनिंग! धावत्या लोकलमधून चिमुकल्याचा जीवघेणा स्टंट; Video पाहून होईल संताप

Misal Pav Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा झणझणीत मिसळ, रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT