Faf du Plessis Tattoo Meaning: फिटनेस फ्रिक डू प्लेसिसच्या अंगावर असलेल्या टॅटूचा अर्थ काय?

Faf du Plessis Arabic Tattoo Meaning: तुफानी अर्धशतकी खेळी करणाऱ्या फाफ डू प्लेसिसचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Faf Du Plessis
Faf Du Plessis Saam TV
Published On

Faf du Plessis' Tattoo in Urdu: आयपीएल २०२३ स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने २२५ धावांचा डोंगर उभारला होता.

या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान तुफानी अर्धशतकी खेळी करणाऱ्या फाफ डू प्लेसिसचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Faf Du Plessis
Virat Kohli Fined: गांगुली वादानंतर विराटच्या अडचणीत वाढ! आता BCCI ने केली मोठी कारवाई

या सामन्यात फाफ डू प्लेसिसने तुफान फटकेबाजी करत चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने या सामन्यात फलंदाजी करताना ६२ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीसह चर्चेत राहिली त्याची फिटनेस. (Faf du Plessis Tattoo Meaning)

डू प्लेसिसच्या या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये कमालीची फिटनेस दिसून येत आहे. या फोटोमध्ये त्याने टी शर्ट वर केले आहे. त्यात त्याचे अॅब्स दिसून येत आहेत. तसेच त्याचा टॅटू देखील चर्चेचा विषय ठरतोय.

डू प्लेसिसच्या टॅटूचा अर्थ काय?

फाफ डू प्लेसिसला (Faf Du Plessis Tattoo) टॅटूची खूप आवड आहे. त्याच्या अंगावर अनेक टॅटू आहेत. मात्र चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान त्याने टी शर्ट काढले आणि टॅटूची चर्चा रंगायला सुरुवात झाली.

त्याच्या अंगावर असलेल्या टॅटूचा अर्थ काय हे अनेकांना जाणून घ्यायचं आहे. त्याने उर्दू भाषेत फज्ल असे लिहिले आहे. याचा अर्थ आशीर्वाद असा आहे. त्याची अशी श्रद्धा आहे की, ईश्वरच्या कृपेमुळेच तो यशस्वी झाला आहे. ( Latest sports updates)

Faf Du Plessis
Fights In IPL: मुबंईच्या मैदानावर दिल्लीकरांचा तुफान राडा! सामन्यानंतर झाली मोठी कारवाई

चेन्नईचा जोरदार विजय..

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २२६ धावा केल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून शिवम दुबे आणि डेवोन कॉनव्हेने अप्रतिम फलंदाजी केली.

शिवम दुबेने या डावात फलंदाजी करताना ५२ तर कॉनव्हेने ८३ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. विराट कोहली स्वस्तात माघारी परतला.

त्यानंतर फाफ डू प्लेसिसने ६२ आणि ग्लेन मॅक्सवेलने ७२ धावांची खेळी केली. मात्र इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ८ धावांनी गमावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com