Rohit Sharma Praises Arjun Tendulkar : पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सने IPL 2023 मध्ये सुरुवातीला दोन सामने गमावल्यानंतर आता सलग तिसरा विजय मिळवला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने मंगळवारी राजीव गांधी स्टेडियमवर यजमान सनरायझर्स हैदराबादचा 14 धावांनी पराभव केला.
मुंबईच्या या विजयात १७.५ दशलक्षांमध्ये विकला गेलेला ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीन आणि करियरमधला दुसरा सामना खेळणारा अर्जुन तेंडुलकर यांचा महत्त्वाचा वाटा होता.
विजयानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने या दोन्ही खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले. 'हिटमॅन' म्हणाला, "आम्ही आनंदी आहोत की असे फलंदाज समोर येत आहेत. आपण गेल्या मोसमात तिलक वर्माला पाहिले होते आणि यावेळीही तो बॉलरकडे नाही तर बॉलकडे पाहत असल्याचे दिसत आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 5 गडी गमावून 192 धावा केल्या आणि त्यानंतर हैदराबादला 19.5 षटकांत 178 धावांत गुंडाळले. ग्रीनने 64 धावा करण्यासोबतच गोलंदाजीमध्ये 4 षटकात 29 धावा देऊन एक बळी देखील घेतला. या कामगिरीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
रोहितकडून अर्जुन तेंडुलकरचं कौतुक
शेवटचं षटक टाकून संघाला विजय मिळवून देणाऱ्या अर्जुन तेंडुलकरवर देखील रोहितने कौतुकाचा वर्षाव केला. रोहित म्हणाला, "तो तीन वर्षांपासून आमच्यासोबत आहे. संघाला त्याच्याकडून काय हवे आहे हे त्याला माहीत आहे. त्याच्या योजनाही अचूक आहेत. तो परिस्थिती सोपी ठेवतो. सुरुवातीला स्विंग करतो आणि शेवटी अचूक यॉर्करही करतो", असे म्हणत रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकरची पाट थोपटली. (Latest Sports News)
गोलंदाजांना आत्मविश्वास द्यायचा होता - रोहित
पुढे बोलताना रोहित म्हणाला, “या मैदानाशी माझ्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत. येथे तीन वर्षे खेळलो आणि ट्रॉफीही जिंकली. आम्हाला आमच्या गोलंदाजांना आत्मविश्वास द्यायचा होता. आयपीएल सुरू झाले तेव्हा यातील अनेकांनी आयपीएल खेळले नव्हते. जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा ते आपले काम करतात. आम्ही फक्त टेम्पो सेट करण्याबद्दल बोलतो."
अर्जुन तेंडूलकरने घेतली पहिली विकेट
शेवटच्या षटकात भुवनेश्वर कुमारला बाद करून अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमधील पहिली विकेट घेतली. अर्जुनने 2.5 षटकात 18 धावा देत एक विकेट घेतली. अर्जुनने ओव्हरचा 5वा चेंडू ऑफ-स्टंपजवळच्या फुलर चेंडूजवळ टाकला, जो भुवीने एक्स्ट्रा कव्हरवर मारण्याचा प्रयत्न केला मात्र टायमिंग व्यवस्थित न बसल्याने तो एक्स्ट्रा कव्हरवर झेलबाद झाला. यावेळी मुलाने पहिली विकेट घेतल्याचा आनंद पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या सचिन तेंडुलकरच्या चेहऱ्यावरही दिसत होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.