andre russel six twitter
Sports

Andre Russell Six: आंद्रे रसेलने पाकिस्तानी गोलंदाजाला दाखवलं आस्मान! खेचला 107 मीटर लांब षटकार, पाहा VIDEO

MLC 2024, Andre Russell Six Video: वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज आंद्रे रसेलने हॅरिस रउफच्या गोलंदाजीवर १०७ मीटर लांब षटकार मारला आहे.ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेतील चौथ्या सामन्यात लॉस एंजिल्स नाईट रायडर्स आणि फ्रांसिस्को युनिकॉर्न्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात लॉस एंजिल्स नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधित्व करत असलेल्या आंद्रे रसलने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रउफच्या गोलंदाजीवर १०७ मीटर लांब षटकार मारला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज आंद्रे रसेल हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. या स्पर्धेतही त्याच्या आक्रमक फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळत आहे. त्याने हा षटकार लॉस एंजिल्स नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधित्व करताना फ्रांसिस्को युनिकॉर्न्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात खेचला आहे.

हा षटकार त्याने पहिल्या डावातील शेवटच्या षटकात खेचला आहे. वेगवान गोलंदाजी करणाऱ्या रउफने लेंथ चेंडू टाकला. हा चेंडू आंद्रे रसेलने मैदानाबाहेर फेकून दिला. हा चेंडू इतका लांब गेला की, १०७ मीटर लांब जाऊन पडला. हा षटकार पाहून क्रिकेट पाहण्यासाठी आलेले फॅन्सही चक्रावून गेले. हॅरिस रउफच्या गोलंदाजीवर गगनचुंबी षटकार मारण्याची ही त्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही २०२३ मध्ये त्याने गगनचुंबी षटकार खेचला होता.

आंद्रे रसेलने या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना २५ चेंडूंमध्ये १६० च्या स्ट्राईक रेटने ४० धावा चोपल्या. या खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या ६ गडी बाद १६५ धावांवर पोहोचवली. फ्रांसिस्को युनिकॉर्न्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १६६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना फ्रांसिस्को युनिकॉर्न्स संघाने अवघ्या १५.२ षटकात हा सामना आपल्या नावावर केला.

या संघाकडून धावांचा पाठलाग करताना फिन अॅलनने ३७ चेंडूंचा सामना करत ६३ धावांची खेळी केली. तर मॅथ्यू शॉर्टने अवघ्या २६ चेंडूंचा सामना करत ५८ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान लॉस एंजिल्स नाईट रायडर्स संघाने हा सामना गमावला असला तरदेखील आंद्रे रसेलने खेचलेला हा षटकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

Accident News : घंटागाडीची दुचाकीला धडक, गाडीचा जागीच चक्काचूर

Sanjay Gaikwad: डिफेंडरवरुन महायुतीत नवा बवंडर? संजय गायकवाडांना कुणी घेरलंय?

SCROLL FOR NEXT