alzzari joseph run out twitter
क्रीडा

Alzarri Joseph: क्रिकेटच्या या नियमामुळे अल्जारी जोसेफ रनआऊट असूनही नॉटआऊट राहिला

Ankush Dhavre

Alzarri Joseph Run out Controversy News:

ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील दुसरा टी-२० सामना अॅडिलेडच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने वेस्टइंडिजवर ३४ धावांनी विजय मिळवला.

या विजयासह ऑस्ट्रेलियाने या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्यात फलंदाजी करत असलेल्या अल्जारी जोसेफच्या रनआऊटवरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Alzarri Joseph Run out)

तर झाले असे की, ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी सुरु असताना १९ वे षटक टाकण्यासाठी स्पेंसर जॉनसन गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकातील तिसरा चेंडू स्पेंसरने ऑफ साईडच्या दिशेने टाकला.

या चेंडूवर फलंदाज अल्जारी जोसेफने ऑफ साईडच्या दिशेने फटका मारला. शॉट मारताच अल्जारी जोसेफ धावला. त्यावेळी क्षेत्ररक्षण करत असलेल्या मिचेल मार्शने क्षणाचाही विलंब न करता चेंडू उचलला आणि स्पेंसर जॉन्सनकडे फेकला. हा चेंडू पकडून त्याने यष्टीला लावलं, ज्यावेळी त्याला धावबाद केलं त्यावेळी अल्जारी जोसेफची बॅट क्रिझपासून १ फुट लांब होती. मात्र तरीही फलंदाजाला बाद घोषित केलं गेलं नाही. नेमकं काय घडलं? जाणून घ्या. (Cricket news in marathi)

क्रिकेटच्या या नियमामुळे बचावला अल्जारी जोसेफ...

या सामन्यात जेरार्ड एबूड अंपारयच्या भूमिकेत होते. अल्जारी जोसेफ मैदानाच्या बाहेर असूनही जेरार्ड एबूडने त्याला बाद घोषित करण्यास नकार दिला. अंपायरने दिलेला निर्णय पाहून ऑस्ट्रलियाच्या खेळाडूंनाही हसू आवरलं नाही.

अल्जारी जोसेफ नॉट आऊट कसा?

तसं पाहायला गेलं तर अल्जारी जोसेफ स्पष्ट आऊट होता. मात्र क्रिकेटचे काही नियम आहेत. या नियमानुसार, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी त्याला आऊट केलं. मात्र कोणीही अपील केली नाही. त्यामुळे अंपायरने त्याला आऊट घोषित केलं नाही आणि तिसऱ्या अंपायरकडे दाजही मागितली नाही. या निर्णयावरुन अंपायर आणि खेळाडूंमध्ये चर्चा ही झाली. टीम डेव्हिडच्या मते त्याने अंपायरकडे अपील केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT