ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेसाठी पॅरिस शहर सज्ज झालं आहे. या स्पर्धेत एकूण १०,५०० सहभाग घेणार आहेत. हे सर्व खेळाडू पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. या स्पर्धेला २६ जुलैला प्रारंभ होणार आहे. यावेळी स्पर्धची ओपनिंग सेरेमनी ही हटके असणार असल्याचं म्हटलं जाणार आहे. यावेळी असं काहीतरी पाहायला मिळणार आहे, जे यापूर्वी कधीच पाहायला मिळालं नाहीये. काय असेल स्पेशल? जाणून घ्या.
तुम्ही आतापर्यंत अनेकदा पाहिलं असेल की, ऑलिम्पिक स्पर्धेच्या ओपनिंग सेरेमनीचं आयोजन स्टेडियममध्ये केलं जातं. मात्र पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी होणाऱ्या ओपनिंग सेरेमनीचं आयोजन हे स्टेडिमयमध्ये केलं जाणार नाहीये. हा रंगारंग सोहळा नदी किनारी आयोजित केला जाणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात यापूर्वी अलं कधीच झालेलं नाही.
तुम्ही आतापर्यंत जितक्या परेड पाहिल्या असतील त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की, एक खेळाडू देशाचा झेंडा घेऊन पुढे जातो. तर इतर खेळाडू त्या खेळाडूच्या मागे असतात. मात्र यावेळी परेड नदी किनारी होणार आहे. मग परेड कशी काढली जाणार? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल ना? तर प्रत्येक देशासाठी १ नाव बोट असणार आहे. ही बोट परेड पूर्वेहून पश्चिमेच्या दिशेने ६ किमी इतकं अंतर पूर्ण करेल. या परेडमध्ये १०,५०० खेळाड सहभाग घेणार आहेत.
पॅरिसमध्ये होणारा ही ओपिनिंग सेरेमनी इतकी ग्रँड होणार आहे की, जितकी आतापर्यंत कधीच झालेली नाही. हा सोहळा जास्तीत जास्त लोकांना पाहता यावा म्हणून, ८० भल्या मोठ्या स्क्रिन्स आणि स्पीकर्स लावण्यात येणार आहेत. हा ऐतिहासिक सोहळा पाहण्याासाठी केवळ फ्रान्समधील फॅन्स नव्हे, तर जगभरातील फॅन्स हजेरी लावणार आहेत. यासह जगभरातील कोट्यवधी फॅन्स हा सोहळा आपल्या मोबाईल स्क्रिन आणि टीव्हीवरुन लाईव्ह पाहणार आहे. या सोहळ्याला भारतीय वेळेनुसार २६ जुलै रात्री २:३० वाजता सुरुवात होणार आहे. म्हणजेच भारतात हा सोहळा २७ जुलै रोजी पाहता येणार आहे.
हा सोहळा पाहण्यासाठी जगभरातून ५ लाखाहूंन अधिक फॅन्स येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. फॅन्सला स्पेशल स्टँड्समधूनही या सोहळ्याचा आनंद घेता येणार आहे. या सोहळ्याच्या तिकीटांची किम्मत २७०० युरो इतकी असणार आहे. भारतीय चलनानुसार या तिकीटांची किम्मत २,४६,००० च्या आसपास असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.