लखनऊ सुपर जाएंट्स आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली उतरली आहे. यावेळी टीम ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली काही खास कामगिरी करणार का हा प्रश्न सर्वांसमोर आहे. मात्र अशातच भारतीय टीमचा माजी स्पिनर गोलंदाज हरभजन सिंगने २७ मार्च रोजी हैदराबाद आणि लखनऊ यांच्यात झालेल्या सामन्यानंतर एलएसजीचा मेंटॉर झहीर खान आणि टीमचा कर्णधार ऋषभ पंत यांच्यातील तणावाबद्दल वक्तव्य केलंय. पंतच्या टीमने हा सामना ५ विकेट्सने जिंकला असला तरी लखनऊचा कर्णधार फलंदाजीबाबत अपयशी ठरला.
हरभजन सिंगच्या म्हणण्यानुसार, झहीर खान आणि ऋषभ पंत यांचे त्याच्या फलंदाजीच्या क्रमाबाबत मत भिन्न आहे. हरभजन सिंगने दावा केला की, लखनऊच्या मेंटॉरला पंतने हैदराबादविरुद्ध टीमसाठी ओपनिंगला खेळावं अशी इच्छा होती, परंतु कर्णधार मधल्या फळीत खेळण्यावर ठाम होता. या सामन्यात त्याला हव्या असलेल्या स्थानावर खेळल्यानंतर पंतने १५ चेंडूत १५ रन्स केले आणि नंतर तो बाद झाला.
हरभजन सिंगने स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्ह शोमध्ये सांगितलं की, झहीर खानला पंतने ओपनिंगला यावं असं वाटत होतं. पण पंतला मिडल ऑर्डरमध्ये खेळायचंय. झहीर खानचा असा विश्वास आहे की, पंतने ओपनिंगला यावं कारण जर त्याने तसं केलं तर फलंदाज म्हणून त्याची सर्वोत्तम कामगिरी समोर येऊ शकतो.
हरभजन म्हणतो की, पंत, निकोलस पूरन किंवा एडेन मार्कराम असो, जर तुम्ही त्यांना तुमचा बेस्ट प्लेअर मानत असाल तर त्यांनी ४ किंवा ५ च्या खाली फलंदाजी करू नये. म्हणूनच मला वाटते की पंतने वरच्या क्रमांकावर खेळावं. पंतने झहीरचं ऐकलं नाही आणि त्याच्या निर्णयाविरुद्ध गेला हे आश्चर्यकारक आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये लखनऊने आतापर्यंत दोन सामने खेळले असून ज्यात त्यांनी एक सामना जिंकला आहे आणि दुसरा सामना गमावला आहे. या टीमचा पुढील सामना आता १ एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध होणार आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये पंत फलंदाज म्हणून अपयशी ठरला आहे. पहिल्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात त्याला केवळ १५ रन्स करता आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.