पुण्यानंतर नगरकरांचं टेन्शन वाढलं; संगमनेरमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ, जीवघेणा हल्ल्यात मुलाचा मृत्यू

Sangamner leopard attack : पुण्यानंतर नगरकरांचं टेन्शन वाढलं आहे. संगमनेरमध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तर संगमनेरमध्ये बिबट्याने चिमुकल्यावर केलेल्या जीवघेणा हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.
Nagar Leopard
Leopard Attack Saam tv
Published On
Summary

संगमनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलाचा मृत्यू

गावात बिबटे व तरसांचा मोठ्या प्रमाणात वावर

संतप्त नागरिकांकडून शासनाविरोधात रोष

वन विभागाकडून नरभक्षक बिबटा जेरबंद

सचिन बनसोडे, साम टीव्ही

राज्यभरात बिबट्यांची वाढलेली संख्या आणि माणसांवर होणारे जीवघेणे हल्ले हा चिंतेचा विषय बनला आहे. शनिवारी सायंकाळी संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय सिद्धेश कडलग या चिमुकल्याने जीव गमावला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे..

जवळे कडलग गावात शेतकरी सूरज कडलग हे गोठ्यात जनावरांना चारा टाकत होते. तर आजी मीराबाई कडलग या कडबा कुट्टी मशीनवर गवत कट करत होत्या. चार वर्षीय सिद्धेश हा घराच्या अंगणात खेळत असताना शेतातील गीन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली आणि सिद्धेशला ओढत नेले.. नातू अचानक गायब झाल्याचे लक्षात येताच आजीने परिसरातील नागरिकांना आवाज दिला.. शोधाशोध केली त्यावेळी गीन्नी गवतात बिबट्याने सिद्धेशला ठार केल्याचे दृश्य दिसले.

Nagar Leopard
लग्नाच्या पहिल्या रात्री नव्या नवरीच्या पायाखालची जमीन सरकली; नवऱ्याचं 'टॉप सिक्रेट' उघड झाल्याने संसारात मिठाचा खडा

या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून परिसरात मोठ्या संख्येने बिबटे आणि तरसांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.. चिमुकल्याचा जीव गेल्याने स्थानिकांनी शासनाविरोधात रोष व्यक्त करत मोबाईलमध्ये चित्रित केलेले बिबट्यांचे अनेक व्हिडिओ दाखवले.. सरकारला शक्य नसेल तर आम्हालाच बिबटे मारण्याचे अधिकार द्या आणि बिबट्यांची नसबंदी करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, वन विभागाचा मोठा फौजफाट जवळे कडलग गावात दाखल झाला. त्यानंतर शोध मोहीम राबवत घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळालंय..परिसरात आणखी बिबटे असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने परिसरात बिबटे पकडण्याची मोहीम सुरूच ठेवणार असल्याची प्रतिक्रिया संगमनेर विभागाचे उपवनरक्षक अमरजीत पवार यांनी दिलीये..

Nagar Leopard
Leopard Threat: बिबट्यांची बकऱ्यांची मेजवानी हुकणार? वनमंत्र्यांचा दावा हास्यास्पद?

राज्यात बिबट्यांची समस्या गंभीर बनली आहे.. शासन उपाययोजन राबवण्यासाठी विविध घोषणा करत असले तरी लोकांचे, विशेषतः लहान मुलांचे जीव जाताय ही वस्तुस्थिती आहे.. बिबट्यांच्या समस्येवर सरकार प्रभावी उपाययोजन कधी राबवणार हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com