लग्नाच्या पहिल्या रात्री नव्या नवरीच्या पायाखालची जमीन सरकली; नवऱ्याचं 'टॉप सिक्रेट' उघड झाल्याने संसारात मिठाचा खडा

Uttar pradesh crime news : उत्तर प्रदेशमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्री नव्या नवरीच्या पायाखालची जमीन सरकल्याची घटना घडली. लग्नाच्या रात्री नवऱ्याचं 'टॉप सिक्रेट' उघड झाल्याने संसारात मिठाचा खडा पडला.
Uttar pradesh news
Uttar pradesh crime news Saam tv
Published On
Summary

कानपूरमधून खळबळजनक घटना समोर

नवरा नपुंसक असल्याचा दावा नवरीने केला

हुंडा न दिल्याने त्रास दिल्याचा नवरीचा आरोप

उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. नव्या नवरीने लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरा नपुंसक असल्याचा दावा केला. त्यानंतर महिलेने सासरच्या मंडळीवर घरातून बाहेर काढण्याचाही आरोप केला. हुंडा न दिल्याने घरातून हाकलून दिल्याचा आरोप नव्या नवरीने केला. या प्रकरणात पीडित महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Uttar pradesh news
Maharashtra Politics :...म्हणून विरोधीपक्षनेते पद हवंय; हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आक्रमक

उत्तर प्रदेशच्या चकेरीमध्ये राहणाऱ्या तरुणीचं १ मे २०२५ रोजी सीसामऊ क्षेत्रात राहणाऱ्या तरुणाशी लग्न झालं. लग्नाच्या रात्री म्हणजे मधुचंद्राच्या दिवशी नवरा नपुंसक असल्याचे नवरीला कळालं. यानंतर तिने नवऱ्याबाबत सासू-सासऱ्याकडे तक्रार केली. त्यानंतर दोघांनी तिच्याकडे दोन लाखांच्या हुंड्याबाबत विचारणा केली.

हुंडा द्यायला विरोध केल्याने सासरच्या मंडळीने मारहाण केल्याचा तिने आरोप केला. या मारहाणीनंतर महिलेने सासू-सासऱ्याची तक्रार स्वत:च्या आईला केली. महिलेचे आई-वडील २३ मे २०२५ रोजी घरी आल्यानंतर त्यांनाही सासू-सासऱ्यांनी हुंडा मागितला.

Uttar pradesh news
Saturday Horoscope : हॉस्पिटलायझेशनवर खर्च होईल, तब्येतीची काळजी घ्या; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

तरुणीच्या तक्रारीनुसार, भांडणानंतर घरी निघून आलेल्या महिलेची तिच्या आई-वडिलांनी समजूत काढून सासरी पाठवलं. नवऱ्याच्या नपुंसकतेवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु त्याच्यावर काही परिणाम झाला नाही.

Uttar pradesh news
बीडमध्ये भयंकर अपघात; डिझेल टँकर जळून खाक; भयावह दुर्घटनेचा घटनाक्रम आला समोर

दुसरीकडे सासरच्या मंडळीने हुंडा न दिल्याचे म्हणत महिलेला घरातून हाकलून दिलं. या प्रकरणातील पीडित महिलेने कमिश्नर रघुवीर लाल यांच्याकडे तक्रार नोंदवली. पोलीस स्टेशनचे प्रभारी रिजवान खान यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com