मोठी बातमी! भाजपने भाकरी फिरवली; राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बड्या नेत्याची नियुक्ती

BJP Latest News : भाजपने अखेर भाकरी फिरवली आहे. राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नबीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
BJP
BJP Latest NewsSaam tv
Published On
Summary

भाजपमध्ये मोठा फेरबदल

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची नियुक्ती

नितीन नबीन हे बिहार सरकारमध्ये मंत्री

भारतीय जनता पक्षाने रविवारी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली. नितीन नबीन हे सध्या बिहारच्या नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. नबीन यांच्याकडे नेतृत्व दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नितीन नबीन आता जेपी नड्डा यांची जागा सांभाळतील. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी त्यांच्या नियुक्तीविषयी माहिती दिली. अरुण सिंह यांनी पत्रकात म्हटलं की, 'भाजपच्या संसदीय बोर्डाने बिहार सरकारमघील मंत्री नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांची नेमणूक तातडीने करण्यात आली आहे'.

BJP
पुण्यानंतर नगरकरांचं टेन्शन वाढलं; संगमनेरमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ, जीवघेणा हल्ल्यात मुलाचा मृत्यू

नबीन २००६ साली झालेल्या पोटनिवडणुकीत जिंकल्यानंतर चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. २०१०,२०१५,२०२० आणि २०२५ साली झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. पटनामध्ये जन्म घेतलेले नितीन नबीन हे भाजपचे वरिष्ठ नेते नवीन किशोर प्रसाद यांचे पूत्र आहेत. नितीन नबीन सिन्हा हे कायस्थ समाजातून येतात. ते भाजयुमो राष्ट्रीय महासचिव देखील होते. ते बिहार सरकारमध्ये मंत्री व्यतिरिक्त छत्तीसगडचे प्रभारी आहेत.

BJP
लग्नाच्या पहिल्या रात्री नव्या नवरीच्या पायाखालची जमीन सरकली; नवऱ्याचं 'टॉप सिक्रेट' उघड झाल्याने संसारात मिठाचा खडा

मागील महिन्यात झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीन नबीन यांनी आरजेडीच्या रेखा कुमारी यांचा पराभव केला. बांकीपूर विधानसभा मतदारसंघात नितीन यांना ९८२९९ मते मिळाली. तर आरजेडी उमेदवार रेखा कुमार यांना ४६३०८ मते मिळाली. याआधी २०२० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नबीन यांनी शत्रुघ्न सिन्हा यांचे पूत्र लव सिन्हा यांचा पराभव केला होता.

BJP
ओबीसी आंदोलकावर भीषण हल्ला; कारच्या काचा फोडल्या, राजकारणात खळबळ

तत्पूर्वी, आज रविवारीच भाजपने उत्तर प्रदेश प्रदेशाध्यपदाच्या नावाचीही घोषणा केली. उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्षपदी पंकज चौधरी यांची नियुक्ती केलगी आहे. त्यांची खासदारकीची सातवी टर्म आहे. त्यांचं कुटुंब देखील राजकारणात आहे. त्यांनी भाजपच्या उत्तर प्रदेशाध्यक्षपदी अर्ज केला होता. त्यानंतर रविवारी त्यांची बिनविरोध निवड झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com