आशिया कपसाठी भारतीय संघाची निवड १९ ऑगस्ट रोजी होणार आहे.
सूर्यकुमार यादव फिट झाला आहे आणि संघात स्थान मिळवण्यास सज्ज आहे.
निवड समिती गिल आणि जयस्वालला आशिया कपमधून वगळू शकते.
अजित आगरकर आणि भारतीय वरिष्ठ निवड समितीचे इतर सदस्य मंगळवारी म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी आशिया कपसाठी भारतीय संघाची निवड करणार आहेत. या बैठकीपूर्वीच टीम इंडियाच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सूर्यकुमार यादवने फिटनेस टेस्ट पास केली असून तो आता या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे.
या स्पर्धेत आठ टीमचा समावेश आहे. आशिया कप ९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून भारताचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध होणार आहे.
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी टी-20 फॉरमॅटमध्ये मिळालेल्या संधींचा उत्तम फायदा घेतलाय. त्यामुळे त्यांना टीमतून वगळण्याचा विचार केला जाणार नाही. पण दुसरीकडे शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल ही भारतीय क्रिकेटमधली मोठी नावं आहेत. त्यामुळे निवड समिती या दोघांना काही काळ टीमबाहेर ठेवण्याचा निर्णय घेते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
स्पोर्ट स्टारच्या वृत्तानुसार, निवड समिती गिल आणि जयस्वालला आशिया कप टीमतून बाहेर ठेवण्याची शक्यता आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने अलीकडे गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली टी-20 मध्ये चांगलं प्रदर्शन केलेल्या टीम विश्वास दाखवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं.
आशिया कपचा शेवट 28 सप्टेंबरला होणार आहे तर वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली टेस्ट 2 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. या दरम्यान फारसा वेळ मिळत नसल्याने शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालला राखून आणि फ्रेश ठेवण्यासाठी व्हाईट बॉलच्या सिरीजतून विश्रांती दिली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यर आणि जितेश शर्माला आशिया कप टीममध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. आयपीएल 2025 मध्ये जितेश शर्माने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी तुफानी फटकेबाजी केली होती. त्याच्या कामगिरीमुळे आरसीबीने पहिल्यांदाच किताब पटकावला.
श्रेयस अय्यरने पंजाब किंग्सला आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचवलं तरी अंतिम सामन्यात त्यांना आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, श्रेयस आणि जितेश दोघेही गंभीरच्या कोचिंगखाली आतापर्यंत टी-20 सामन्यांमध्ये खेळलेले नाहीत. श्रेयसने डिसेंबर 2023 मध्ये शेवटचा टी-20 खेळला होता, तर जितेशने जानेवारी 2024 मध्ये अखेरचा सामना खेळला होता.
निवड समितीच्या सूत्रांनुसार, दुबईतील परिस्थिती लक्षात घेता अनुभवी मधल्या फळीतील फलंदाजाची गरज आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरची निवड जवळजवळ निश्चित मानली जातेय. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतही श्रेयसने यूएईतील सामन्यांत महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्यात भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडला हरवून किताब पटकावला होता.
जर श्रेयसला टीममध्ये घेतलं तर शिवम दुबे किंवा रिंकू सिंह यापैकी कोणाला तरी बाहेर बसावं लागू शकतं. दोघेही जानेवारी 2025 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 सिरीजमध्ये भारतीय टीमचा भाग होते.
आशिया कपसाठी भारतीय संघाची निवड केव्हा होणार आहे?
आशिया कपसाठी भारतीय संघाची निवड १९ ऑगस्ट रोजी होणार आहे.
सूर्यकुमार यादवच्या फिटनेसची काय स्थिती आहे?
सूर्यकुमार यादवने फिटनेस टेस्ट पास केली असून तो संघासाठी उपलब्ध आहे.
शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालला आशिया कपमधून वगळण्याची कारण काय आहे?
टेस्ट संघासाठी त्यांना फ्रेश आणि विश्रांत ठेवण्यासाठी त्यांना व्हाईट बॉल सिरीजमधून विश्रांती दिली जाऊ शकते.
श्रेयस अय्यरची निवड का शक्य आहे?
दुबईतील परिस्थिती आणि मधल्या फळीसाठी अनुभवी फलंदाजाच्या गरजेमुळे त्याची निवड शक्य आहे.
जितेश शर्माची आयपीएल 2025 मधील कामगिरी कशी होती?
जितेश शर्माने आयपीएल 2025 मध्ये आरसीबीसाठी तुफानी फटकेबाजी करून संघाला किताब मिळवून दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.