
आशिया चषक २०२५ साठी हरभजन सिंगने स्वतःचा संघ जाहीर केला.
संजू सॅमसन, रिंकू सिंग आणि तिलक वर्मा यांना संघात स्थान नाही.
केएल राहुल आणि रियान पराग यांचा संघात समावेश.
सूर्यकुमार यादव कर्णधार, तर हार्दिक पांड्या उपकर्णधार असणार.
Harbhajan Singh Picks Asia Cup Squad : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया आशिया चषक जिंकण्यासाठी तयारीला लागला आहे. सूत्रांनुसार, १९ ऑगस्ट रोजी आशिया चषकासाठी टीम इंडियाच्या शिलेदारांची निवड होणार आहे. त्याआधीच माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंह याने आशिया चषकासाठी खेळाडूंची निवड केली आहे. भज्जीने आपल्या संघात संजू सॅमसन, रिंकु सिंह यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर केएल राहुल आणि रियान पराग यांना संघात स्थान दिले आहे.
९ सप्टेंबर २०२५ पासून आशिया चषकाला सुरूवात होणार आहे. तीन आठवड्यात भारतीय संघ चषकासाठी मैदानात उतरणार आहे, पण अद्याप बीसीसीआयकडून संघाची निवड करण्यात आलेली नाही. त्याआधी भज्जीने आशिया चषकासाठी आपला संघ निवडला आहे. भज्जीने निवडलेल्या खेळाडूने अनेकांना धक्का बसला आहे. भज्जीने आशिया चषकाच्या संघात संजू सॅमसन, रिंक सिंह आणि तिलक वर्मा यांच्यासारख्या प्रभावी खेळाडूंना संघात स्थान दिले नाही. केएल राहुल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि रियान पराग यांना भज्जीने संघात घेतले आहे.
यशस्वी जायस्वाल, अभिषे शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, वॉशिंटन सुंदर, रियान पराग, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह यांना भज्जीने घेतले. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना भज्जी म्हणाला की, केएल राहुल हा चांगला पर्याय होऊ शकतो. केएल राहुलचा अनुभव तगडा आहे, त्याचा भारताला फायदा होईल. ऋषभ पंत दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहे. त्यामुळे केएल राहुल याला संधी मिळेल, असे मला वाटतेय.
यशस्वी जयसवाल, अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, वॉशिंगटन सुंदर, केएल राहुल/ऋषभ पंत रियान पराग, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा आणि अर्शदीप सिंह
आशिया चषक २०२५ कधी आणि कुठे होणार आहे?
आशिया चषक ९ ते २८ सप्टेंबर २०२५ दरम्यान संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये, दुबई आणि अबु धाबी येथे होणार आहे.
भारताचा आशिया चषक २०२५ मधील पहिला सामना कोणाविरुद्ध आहे?
भारताचा पहिला सामना १० सप्टेंबर २०२५ रोजी युएईविरुद्ध होणार आहे.
आशिया चषकात भारत-पाकिस्तान सामना कधी होणार आहे?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे.
आशिया चषक २०२५ मध्ये भारत कोणत्या गटात आहे?
आशिया चषकात भारत गट A मध्ये आहे. पाकिस्तान, युएई आणि ओमान यांचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.