BCCI announced Team Indias central contract Saam tv
Sports

BCCI Annual Contract: एका झटक्यात ७ खेळाडूंना केलं बाहेर! दोघांना कमबॅक करण्याची संधी तर ५ खेळाडूंसाठी दारं कायमची बंद

BCCI Annual Contract: २६ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या वार्षिक कॉन्ट्रॅकमधून ७ भारतीय खेळाडूंना वगळण्यात आले आहे

Ankush Dhavre

7 players out of BCCI Annual Contract: खेळाडूंची वर्षभरातील कामगिरी पाहून दरवर्षी बीसीसीआयकडून वार्षिक कॉन्ट्रॅकची घोषणा केली जाते. २६ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या वार्षिक कॉन्ट्रॅकमधून ७ भारतीय खेळाडूंना वगळण्यात आले आहे. ज्यात ५ वरिष्ठ खेळाडू आहेत. तर २ असे खेळाडू आहेत, जे चांगली कामगिरी करून भारतीय संघात पुनरागमन करू शकतात.

Team India

बीसीसीआयने अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान साहा, हनुमा विहारी, मयांक अग्रवाल आणि दीपक चाहर यांना बाहेर केलं आहे. यात दीपक चाहर आणि मयांक अग्रवाल भारतीय संघात पुनरागमन करू शकतात. मात्र इतर खेळाडूंचं पुनरागमन करणं कठीण दिसून येत आहे. (Latest sports updates)

Ajinkya Rahane News, Cricket News in Marathi

भारतीय संघातील अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला फ्लॉप कामगिरी केल्यानंतर संघाबाहेर केलं गेलं होतं. त्यानंतर त्याने रणजी ट्रॉफीत चांगली कामगीरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. तर ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे संघाबाहेर झाले होते. संघातील इतर गोलंदाजांची कामगिरी पाहता या दोन्ही गोलंदाजांना निवृत्तीशिवाय दुसरा पर्याय उरला नाहीये.

bhuvneshwar kumar

तसेच वृद्धीमान साहाला आधीच स्पष्ट केलं गेलं होतं की, आता युवा खेळाडूंना संधी दिली जाणार आहे. भारतीय संघात रिषभ पंत, केएस भरत आणि ईशान किशन सारखे यष्टीरक्षक फलंदाज असताना वृद्धिमान साहाला संधी मिळणं कठीण आहे.

Wriddhiman Saha

तसेच दीपक चाहर आणि मयांक अग्रवालकडे भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी असणार आहे. येत्या काही दिवसात आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत जोरदार कामगिरी करून हे खेळाडू भारतीय संघात पुनरागमन करू शकतात.

Mayank Agarwal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT