Issy Wong Hat Trick Video: WPL ची पहिली हॅटट्रिक घेत इस्सीने रचला इतिहास,पाहा तो ऐतिहासिक क्षण - VIDEO

First Hat Trick In WPL 2023: या सामन्यात मुंबईची गोलंदाज इस्सी वाँगने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Issy Wong Hat Trick video
Issy Wong Hat Trick video Twitter

MI-W VS UP-W Eleminator: वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील एलोमिनेटरचा सामना शुक्रवारी डी वाय पाटीलच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स हे दोन्ही संघ आमने सामने होते.

एकतर्फी सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने युपीचा ७२ धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान या सामन्यात मुंबईची गोलंदाज इस्सी वाँगने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Issy Wong Hat Trick video
Suryakumar Yadav: 'हे चुकीचं आहे,सूर्यकुमार यादवची तुलना संजू सॅमसन सोबत करूच नका..' माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य

पहिला विक्रम हा नेहमीच खास असतो. कारण दुसरा कोण होता हे खूप कमी लोकांना लक्षात राहतं. आता जोपर्यंत वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धा सुरू राहील तोपर्यंत इस्सी वाँगचं नाव घेतलं जाणार आहे. (Latest sports updates)

पहिल्या वहिल्या वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत पाहिली हॅटट्रिक घेण्याचा कारनामा इस्सी वाँगने केला आहे. यासह ती वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत हॅटट्रिक घेणारी पहिलीच गोलंदाज ठरली आहे.

या सामन्यात इस्सी वाँगने सुरुवातीच्या २ षटकांमध्ये केवळ ११ धावा खर्च केल्या होत्या. यादरम्यान तिने विस्फोटक फलंदाज एलिसा हेलीला पॅव्हेलियनची वाट दाखवली होती.

त्यावेळी मुंबईला विकेटची गरज असताना इस्सी वाँग गोलंदाजीला आली आणि १३ व्या षटकात ऐतिहासिक कामगिरी केली.

हे षटक मुंबईच्या विजयात योगदान देणारे महत्वाचे षटक ठरले. कारण तिने षटकातील दुसऱ्या चेंडूवर किरण नवगिरेला झेल बाद केले. त्यानंतर सिमरन शेखला भेदक यॉर्कर टाकत क्लीन बोल्ड केले.

हॅटट्रिक चेंडूचा सामना करण्यासाठी सोफी एक्लेस्टन फलंदाजीला आली होती. या चेंडूवरही तिने सोफीच्या दांड्या गूल केल्या आणि वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासातील पहिली हॅटट्रिक मिळवण्याचा मान मिळवला.

Issy Wong Hat Trick video
Shreyas Iyer : IPL तोंडावर असताना श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय! दुखापतग्रस्त असूनही सर्जरी करण्यास दिला नकार

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, युपी वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाने नॅट सिवर ब्रंटच्या ७२ धावांच्या खेळीच्या जोरावर ४ गडी बाद १८२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना युपीचा संघ ११० धावांवर संपुष्टात आला. हा सामना ७२ धावांनी जिंकून मुंबईने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध रंगणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com