Suryakumar Yadav: 'हे चुकीचं आहे,सूर्यकुमार यादवची तुलना संजू सॅमसन सोबत करूच नका..' माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य

Kapil Dev: निराशाजनक कामगिरीनंतर त्याची तुलना आता संजू सॅमसन सोबत होऊ लागली आहे
Suryakumar Yadav and Sanju Samson
Suryakumar Yadav and Sanju SamsonSaam Tv
Published On

Kapil Dev on Suryakumar Yadav: नुकताच भारत विरुद्व ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता.

तर मालिकेतील पुढील २ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने विजय मिळवत ही मालिका २-१ ने खिशात घातली. या मालिकेत भारतीय संघातील आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव पूर्णपणे फ्लॉप ठरला.

तिन्ही सामन्यांमध्ये तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला. या निराशाजनक कामगिरीनंतर त्याची तुलना आता संजू सॅमसन सोबत होऊ लागली आहे. दरम्यान याबाबत माजी भारतीय क्रिकेटपटूने मोठे वक्तव्य केले आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेली वनडे मालिका ही सूर्यकुमार यादवसाठी एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. त्याला ३ सामन्यांमध्ये एकही धाव करता आली नाही.

इतकेच नव्हे तर तो ३ सामन्यांमध्ये केवळ ३ चेंडू खेळू शकला. या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाला ही मालिका गमवावी लागली आहे. (Latest sports updates)

अनेक दिग्गजांनी असे देखील म्हटले की, सूर्यकुमार यादवला संघाबाहेर करून संजू सॅमसनला संधी दिली गेली पाहिजे. मात्र कपिल देव यांनी सूर्यकुमार यादवला समर्थन केल्याचे पाहायला मिळाले आहे.

Suryakumar Yadav and Sanju Samson
Shreyas Iyer : IPL तोंडावर असताना श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय! दुखापतग्रस्त असूनही सर्जरी करण्यास दिला नकार

कपिल देव यांनी म्हटले की, 'जो खेळाडू चांगली कामगिरी करतोय त्याला संधी मिळणारच. सूर्यकुमार यादवची तुलना संजू सॅमसनसोबत करू नका. जेव्हा संजू सॅमसन खराब कामगिरी करत असतो त्यावेळी तुम्ही दुसऱ्या खेळाडूबद्दल बोलू लागता. असं मुळीच व्हायला नको. जर संघ व्यवस्थापकांनी ठरवलं आहे की, त्याला संधी मिळणार, तर मिळालीच पाहिजे. लोक काहीही बोलतील अंतिम निर्णय संघ व्यवस्थापक घेतील.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com