WPL 2023 FINAL: रविवारी विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा ६ गडी राखून धुव्वा उडवला आहे. यासह मुंबई इंडियन्स हा संघ विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेचे जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला आहे.
आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग स्पर्धा आहे. गतवर्षी या स्पर्धेत विजय मिळवणाऱ्या गुजरात टायटन्स संघाला २० कोटी रुपये मिळाले होते.
तर विमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला बक्षीस म्हणून ६ कोटी रुपये आणि ट्रॉफी दिली गेली आहे. तर उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्स संघाला ३ कोटी रुपये मिळाले आहेत.
पहिल्या डावात दिल्लीने केल्या १३१ धावा..
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाची कर्णधार मेग लेनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र दिल्लीच्या फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. दिल्ली कडून मेग लेनिंगने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली.
तर शेवटी राधा यादव आणि शिखा पांडे यांनी महत्वाची भागीदारी करत दिल्लीचा डाव १३१ धावांपर्यंत नेला. (Latest sports updates)
नॅट सिवर ब्रंटची तुफानी खेळी..
मुंबई इंडियन्स संघाला जेतेपद मिळवण्यासाठी १३२ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना मुंबईला देखील हवी तशी सुरुवात मिळाली नव्हती.
त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने डाव सावरला आणि ३५ धावांची खेळी केली. हरमनप्रीत कौर धावबाद झाल्यानंतर अनुभवी नॅट सिवर ब्रंटने दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तिने तुफानी अर्धशतकी खेळी करत मुंबईला पहिले जेतेपद मिळवून दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.