AIFF general secretary Kushal Das resigns. saam tv
Sports

अखेर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव कुशल दास यांनी घेतला माेठा निर्णय

प्रशासक समितीने त्यांना कामकाजापासून दूर ठेवले हाेते अशीही चर्चा हाेती.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : अखिल भारतीय फुटबॉल (football) महासंघाचे सचिव कुशल दास (AIFF general secretary Kushal Das) वैद्यकीय कारणास्तव पदाचा राजीनामा दिला आहे. दास यांचा बारा वर्षांचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. दास यांच्यावर आर्थिक अनियमिततेचे सातत्याने आरोप केले जात हाेते. दरम्यान महासंघाच्या दैनंदिन कारभाराची जबाबदारी प्रभारी सरचिटणीस सुनंदो धर यांच्याकडे साेपविण्यात आली आहे. (kushal das latest marathi news)

सन 2010 मध्ये पदभार स्वीकारलेल्या दास हे प्रकृतीच्या कारणास्तव दहा दिवसांपासून (ता.20 जून) रजेवर होते. दरम्यान फुटबॉल जगतातील तज्ञांच्या म्हणण्यानूसार प्रशासक समितीने त्यांना कामकाजापासून दूर ठेवले हाेते.

नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयशी बाेलताना एका उच्चपदस्थ अधिका-याने दास यांनी आरोग्याच्या कारणांमुळे राजीनामा दिल्याचे म्हटले. दास यांच्यावर यापूर्वी एआयएफएफच्या एका महिला कर्मचाऱ्याने विनयभंगाचा आरोप केला होता. अंतर्गत तक्रार समितीने ते निर्दाेष असल्याचा निकाल दिला. त्यानंतर संस्थेला टीकेला सामोरे जावे लागले.

एएफसी आशियाई करंडक स्पर्धेत पात्रता फेरीतील वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय संघाचे (india) भविष्य सांगण्यासाठी ज्योतिष कंपनीला 16 लाखांहून अधिक पैसे दिले गेले अशीही चर्चा रंगली हाेती. दरम्यान सन 2010 मध्ये AIFF मध्ये सामील होण्यापूर्वी, दास यांनी दोन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून काम केले.

दास यांच्या कार्यकाळात भारतीय संघ आशियाई करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी तीनदा पात्र ठरला, परंतु वरिष्ठ संघासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने आयोजित करू न शकल्याने दास यांना टीकेचा सामना करावा लागला हाेता. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने दास यांच्या याेगदानाबद्दल त्यांचे ट्विट करुन आभार मानले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyadarshini Indalkar: चुनरी तेरी कमाल कर गई.... प्रियदर्शनी इंदुलकरचा हटके लूक

कसारा घाटात कामगारांचा बिऱ्हाड मोर्चा, मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईकडे मोर्चा वळवणार

Nia Sharma: नागिन फेम निया शर्माने खरेदी केली मर्सिडीज कार; किंमत वाचून नेटकरी थक्क

मुंबईतील 'या' नदीवर उभारणार नवा पूल; सायन, कुर्ला, BKC जाणाऱ्यांना फायदा

Pune : कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली फुलं; फुले उचलण्यासाठी नागरिकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT