Skin Care: फोन व लॅपटॉपमधून येणाऱ्या किरणातून चेहऱ्याचे संरक्षण कसे कराल ?

तरुण पिढीमध्ये मोबाईल व लॅपटॉपच्या वापराचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढले आहे.
Skin care Tips, eye care tips, Simple ways to protect skin from mobile radiations
Skin care Tips, eye care tips, Simple ways to protect skin from mobile radiationsब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्यापैकी बरेचजण मोबाईल फोनचा वापर करतात. तरुण पिढीमध्ये मोबाईल व लॅपटॉपच्या वापराचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढले आहे. (how to protect eyes & Skin from blue light)

हे देखील पहा -

आपण दिवसभर कामाच्या ठिकाणी मोबाईल फोन व लॅपटॉपचा वापर करत असतो. त्यामुळे आपल्या डोळ्यांना त्याचा त्रास जाणवू लागतो. डोळ्यांबरोबर त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरही परिणाम होऊ लागतो. त्यामुळे आपल्या मुरुमे, सुरकुत्या व चेहऱ्यावर तयार होणाऱ्या डागांना सामोरे जावे लागते. यापासून आपल्या चेहऱ्याचे रक्षण कसे कराल हे पाहूया.

१. काम करताना आपल्या खाण्यापिण्याचा विसर पडतो परंतु, मोबाईल व लॅपटॉमधून निघणाऱ्या किरणांमुळे आपल्याला पिगमेंटेशन, काळी वर्तुळे, रॅशेस इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी आपल्याला सतत पाणी पिणे गरजेचे आहे. शरीर आणि त्वचा जितके जास्त हायड्रेटेड ठेवाल तितके कमी नुकसान होईल.

Skin care Tips, eye care tips, Simple ways to protect skin from mobile radiations
आपल्या हाताच्या शिरा निळ्या का असतात ?

२. कामाच्या व्यापामुळे लॅपटॉपवर तासनतास काम करावे लागत असेल तर रिफ्लेक्टर शील्डचा वापर करावा. हे कवच लॅपटॉप आणि त्वचेमध्ये अडथळा म्हणून काम करेल आणि त्यातून निघणाऱ्या उष्णता आणि रेडिएशनच्या थेट परिणामांपासून आपले संरक्षण करेल.

३. अँटी-ऑक्सिडंटसारखे पदार्थ त्वचेवर मुक्त रॅडिकल्सचा वाढलेला प्रभाव टाळण्यासाठी बरे करण्याचे कार्य करतात. त्यामुळे त्वचेवर रेडिएशनचा प्रभाव कमी होतो. अशावेळी आपण भरपूर फळे आणि सलादचे सेवन करायला हवे.

४. सतत लॅपटॉप (Laptop) आणि मोबाईलचा (Mobile) वापर करत असू तर आपण चेहरा दर दोन तासांनी धुवायला हवा.

५. लॅपटॉपचा वापर करताना त्याला पायावर किंवा मांडीवर घेऊन बसू नका. त्यासाठी वेगळी खूर्ची किंवा डेस्कचा वापर करा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com