आपल्या हाताच्या शिरा निळ्या का असतात ?

आपले आरोग्याच्या बाबतीत काही गोष्टी या गुंतागुंतीच्या आहेत.
Interesting fact about health, Blue veins in hand
Interesting fact about health, Blue veins in handब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : आपले आरोग्याच्या बाबतीत काही गोष्टी या गुंतागुंतीच्या आहेत. शरीराचे आरोग्य (Health) सुदृढ असेल तर आपण निरोगी असू पण शरीराला इतर दुखापत झाली तर आपल्याला त्याचा त्रास होऊ लागतो.

हे देखील पहा -

आपल्या शरीरातील कोणतीही रक्त वाहिनी ही चुकीच्या पध्दतीने दाबली गेली तर तर त्रासदायक ठरु शकते. आपण आपल्या शरीराच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे अधिक दुर्लक्ष करतो व त्याचे रुपातंर गंभीर आजारात होत जाते. आपल्या शरीरातील काही गोष्टी या सामान्य वाटत असतात परंतु, आपल्या हाताच्या शिरा या निळ्या रंगाच्या का दिसतात याबद्दल जाणून घेऊया.

शरीरतील मज्जातंतूंचे कार्य काय आहे ?

आपल्या शरीरातील वेगवेगळ्या रक्तपुरवठा करण्याचे काम नसा करत असते. डोक्यापासून ते हृदयापर्यंत सगळ्या नसांना रक्तपुरवठा करण्याचे काम नसांमुळे होत असते. रक्त (Blood) हृदयातून रक्तवाहिन्यांद्वारे धमन्या आणि केशिकांकडे पंप केले जाते आणि नंतर रक्तवाहिन्यांद्वारे ते शरीराच्या इतर भागांमध्ये जाते.

Interesting fact about health, Blue veins in hand
तरुणांमध्ये वाढणाऱ्या उच्च रक्तदाबाच्या आजाराला दूर कसे ठेवाल?

शिरा निळ्या रंगाच्या का असतात ?

आपल्या शरीरातील रक्त हे लाला रंगांचे असते परंतु, आपल्या नसांवर असणारे त्वचेवर प्रकाशाच्या परिवर्तनावर आधारित असते. आपल्या डोळ्यांत निळा प्रकाश परावर्तित झाल्यामुळे शिरा आपल्याया निळ्या रंगाच्या दिसू लागतात. लाल प्रकाशाप्रमाणे निळा प्रकाश मानवी ऊतींमध्ये खोलवर प्रवेश करत नाही. त्वचेच्या जवळ ज्या काही शिरा असतात, त्या या परावर्तनामुळे त्या निळ्या दिसू लागतात.

नसा निळ्या केव्हा दिसतात. -

१. आनुवंशिकतेमुळे

२. महिलांच्या मासिक पाळीच्या दरम्यान

३. खोल शिरा थ्रोम्बोसिस सारख्या रोगादरम्यान

४. वाढत्या वजनामुळे

५. रक्तदाबमध्ये होणारा बद्दल

६. दीर्घकाळ उभे राहणे किंवा त्याच प्रकारचे काम करणे

७. औषधाच्या प्रतिक्रियेमुळे

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com