गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांची सर्वात मोठी घोषणा, VIDEO

raj thackeray news : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वात मोठी घोषणा केलीये. ते पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.
raj thackeray
raj thackeray news : Saam tv
Published On

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठी घोषणा केली आहे. जाहीर मेळाव्यात नवीन वेबसाइट सुरू केल्याची घोषणा केली. 'महाराष्ट्र पुढचा', या नव्या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर नवी वेबसाइट सुरू केली आहे. राज ठाकरेंनी वेबसाइटचे कामकाज कसे चालेल, याचीही माहिती दिली.

राज ठाकरे म्हणाले, 'वेबसाइटमध्ये मराठी आणि इंग्रजी पर्याय उपलब्ध केले. तुम्हाला कल्पना नोंदवण्यासाठी २७ विषय दिले आहेत. तुमच्या नव्या कल्पना मांडू शकता. आम्ही तुम्ही आणि सरकारमधील वाहक असू. सरकारकडून कशी करू घ्यायची. त्यासाठी तज्ञांकडे ही माहिती जाईल. त्यांच्याकडून ही माहिती सरकारकडे जाईल'.

'२७ गोष्टी दिल्या आहेत. रस्ते, पायाभूत विकास, व्यवसाय सुलभता असे अनेक विषय यात असतील. या प्रत्येक गोष्टीत उपशाखा आहेत. त्यात अनेक विषय आहेत. त्यात तुमची कल्पना नोंदवू शकता. त्यात गरज असल्यास फाइल, फोटो अपलोड करू शकता. त्यात मोबाईल नंबर टाकायचा आहे. ओटीपी आल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती द्यायची आहे, असे ठाकरे पुढे म्हणाले.

'तुम्ही सांगेपर्यंत तुमची वैयक्तिक माहिती सरकारला देणार नाही. उद्या तुमची कल्पना आवडली, तर तुम्हाला विचारलं जाईल की, तुमचं नाव आणि नंबर सरकारला द्यायचा का. त्यामुळे ती गोष्ट गुपित राहील, अशी माहिती राज ठाकरे यांनी सांगितली.

raj thackeray
इराणला मोदींनी साथ द्यायला हवी होती; गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे असे का म्हणाले?

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे म्हणाले, 'ग्रामीण भागातील तरुण-तरुणी शेतीकडे वळायला तयार नाहीत. परंतु शहरात आल्यावर ही अवस्था... प्रत्येक शहर बघा, ना आकार ना उकार, कुणीही येतंय. इमारती बांधतंय. त्याला कसलीही परवानगी देतायेत. तुम्ही पाहता मोबाइलवर राग व्यक्त करता आणि शांत बसता. तुम्ही रस्त्यावर येता कामा येत. असेच सडा आणि असेच मरा. तीन वेळा कर्जमाफी झाली शेतकऱ्यांची, पण सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा आकडा महाराष्ट्रातील आहे. दररोज आत्महत्या होताहेत , कुणाला काहीही पडली नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com