Raj Thackeray speech on social media distraction : सरकार तुम्हाला जाणीवपूर्वक आयपीएल, चित्रपट आणि मोबाईलमधील करमणुकीत गुंतवून ठेवत आहे, जेणेकरून तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकणार नाही. त्यामुळे या इन्स्टाग्रामच्या मोहजालातून तातडीने बाहेर या, असे परखड आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील सभेत केले. (Raj Thackeray latest speech)
राज ठाकरे म्हणाले की, सध्या लोकांना सतत कोणत्या ना कोणत्या करमणुकीत व्यस्त ठेवण्याचे डिझाईन आखले गेले आहे. मोबाईल आता आपला एक अवयव झाला आहे. लोक आपला राग फक्त सोशल मीडियावर व्यक्त करतात, पण रस्त्यावर उतरून प्रश्न विचारत नाहीत. ही परिस्थिती राज्यासाठी आणि देशासाठी घातक आहे,अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
टीव्ही चॅनेलवर वरून दबाव आणला जातो, बातम्या दाबल्या जातात. जनतेपर्यंत खरी माहिती पोहोचू दिली जात नाही. तुम्ही करमणुकीच्या या 'गटारगंगा'मध्ये वाहत गेलात, तर उद्या आपल्या आजूबाजूला काय बदलले हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही, कारण आपण मोबाइलमध्ये अडकलोय, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.