मुंबई : भावनिक आवाहन करूनही एकनाथ शिंदे यांनी बंड सुरूच ठेवल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बुधवारी फेसबुकवर लाईव्ह येत त्यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर राज्यपालांची भेट घेत त्यांनी अधिकृतपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची प्रतिक्रिया समोर आली आहे. (Kangana Ranaut Latest News)
कंगना रणौत आणि उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा आकडा नेहमीच छत्तीसचा राहिला आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. संजय राऊतसोबत कंगना राणौतची अनेकदा खडाजंगी झाली, त्यानंतर बीएमसीने कंगना राणौतच्या ऑफिसवर बुलडोझर चालवला. त्यावेळी कंगना रणौतने उद्धव ठाकरे सरकारला आव्हान दिले होते आणि आज माझे घर तुटले आहे, लवकरच तुमचे घर तुटणार आहे. असं कंगणाने म्हटलं होतं. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यानंतर कंगना राणौतची प्रतिक्रिया सर्वप्रथम समोर आली आहे. (Uddhav Thackeray News)
कंगना रणौतने आपल्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कंगना म्हणते, "1975 नंतर हा काळ भारताच्या लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा काळ आहे. 1975 साली लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या आव्हानामुळे एक सरकार आलं होतं. आणि एक सरकार कोसळलं होतं. 2020 मध्ये मी म्हटलं होतं की, लोकशाही ही एक श्रद्धा आहे. सत्तेच्या लालसेपोटी जे लोकांचा विश्वास तोडतात, त्यांची घमेंड तुटणार हे निश्चित. ही व्यक्तीची शक्ती नाही. हीच खऱ्या चारित्र्याची शक्ती आहे".
पुढे बोलताना कंगणा म्हणाली की, "पवनपुत्र हनुमान यांना शंकराचा 12वा अवतार मानले जाते. जेव्हा शिवसेनेने हनुमान चालिसावर बंदी घातली तेव्हा शिवही त्यांना वाचवू शकत नाही, हे निश्चित झालं होतं. हर हर महादेव, जय हिंद". अशी पोस्ट कंगणा रणौतने केली आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.