औरंगाबादच्या नामांतरानंतर कॉंग्रेसमध्ये राजकीय भूकंप; आतापर्यंत २०० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

औरंगाबाद शहर काँग्रेसच्या तब्बल 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Aurangabad Renamimg Sambahjinagar
Aurangabad Renamimg Sambahjinagar Saam Tv

औरंगाबाद : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काल झालेल्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादसह (Aurangabad) उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. नामांतराच्या प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर याचे पडसाद औरंगाबादत उमटू लागले आहेत. एमआयएमने याला विरोध केला असताना दुसरीकडे औरंगाबाद शहर काँग्रेसच्या (Congress) तब्बल 200 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Aurangabad Latest News)

Aurangabad Renamimg Sambahjinagar
कोरोनाची चौथी लाट आली? देशातील 24 तासांतील आकडेवारी उरात धडकी भरवणारी

औरंगाबाद काँग्रेसचे शहर अध्यक्ष हिशाम ओस्मानी यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी या संदर्भात आज सकाळी फेसबुक पोस्ट करून औरंगाबाद शहराचे नाव बदलून शहराचे ऐतिहासिक ओळख पुसण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला आहे, याचा निषेध म्हणून मी पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. शहराध्यक्षांचा राजीनामा राहुल गांधी स्वीकारतील का अशी चर्चा सध्या सुरू आहे. (Aurangabad Latest Marathi News)

बुधवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महत्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठकीत अपेक्षेप्रमाणे नामांतराचे मोठे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार, औरंगाबाद शहराच्या 'संभाजीनगर' नामकरणास आणि उस्मानाबाद शहराच्या 'धाराशीव' नामकरणास कॅबिनेटने मान्यता दिली. दोन शहरांच्या नामांतराचा प्रश्न गेली 25 ते 30 वर्ष होता. अखेर उद्धव ठाकरे यांनी आपल्या सरकारचं काऊंडडाऊन सुरु असताना दोन मोठे निर्णय घेतले. (Aurangabad Congress News)

Aurangabad Renamimg Sambahjinagar
एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट; म्हणाले भाजपसोबत अद्यापही मंत्रिपदाबाबत...

औरंगाबाद नामांतरावरून MIM आक्रमक

औरंगाबादचे नामांतर होत असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय करीत होते? सत्तेसाठी एवढ्या खालच्या स्तरावर गेले की, जिल्हाचा इतिहास मिटविण्यास निघाले. जिल्ह्याचे नाव औरंगाबाद होते आणि पुढेही तेच राहणार, असे म्हणत ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील संभाजीनगरच्या नामांतरावर संताप व्यक्त केला. दोन्ही काँग्रेसचे नेते दलाल असल्याचे म्हणत जिल्ह्यात एमआयएम त्यांचे चांगले स्वागत करेल, असा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला.

Aurangabad Renamimg Sambahjinagar
फडणवीसांनी मुख्यमंत्री दलित समाजाचा करावा; RPI खरात गटाची मागणी

औरंगाबादेत MIM विरोधात मनसे आक्रमक

दरम्यान, इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद नामांतराच्या प्रस्तावाला विरोध केल्याने मनसे देखील आक्रमक झाली आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचं सर्व बाजूनी अभिनंदन होत असताना, ह्या जिल्ह्याचे खासदार श्री जलील साहेब यांनी संभाजीनगर नावाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा केली. जलील जर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असतील, तर या जिल्ह्यातील सर्व हिंदू बांधव आणि मनसे संभाजीनगरच्या नावासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com