ahmedabad hotels saam tv
Sports

World Cup 2023: ओपनिंग अन् फायनल सामना गुजरातमध्ये! हॉटेल्सच्या दरात १० पटीने वाढ; किंमत वाचून आकडीच येईल

Ahmedabad Hotel Room Rates: या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा होताच अहमदाबादकरांची चांदी झाली आहे. अहमदाबादमधील हॉटेल्सचे दर गगनाला जाऊन भिडले आहेत.

Ankush Dhavre

Ahmedabad: आयसीसी आणि बीसीसीआयने आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वेळापत्रकाची घोषणा केली आहे. मंगळवारी एका भव्य अशा सोहळ्यात या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेतील पहिला आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा होताच अहमदाबादकरांची चांदी झाली आहे. अहमदाबादमधील हॉटेल्सचे दर गगनाला जाऊन भिडले आहेत.

हॉटेल्सच्या किमतीत अचानक वाढ..

आगामी आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील महत्वाचे सामने अहमदाबादमध्ये खेळवले जाणार आहेत. बहुप्रतिक्षीत भारत - पाकिस्तान सामन्याचे आयोजन देखील भारतात केले जाणार आहे. या सामन्याची अधिकृत घोषणा होताच, अहमदाबादच्या हॉटेल्स बुकिंगमध्ये वाढ झाली आहे. वर्ल्ड कप स्पर्धा सुरु व्हायला अजूनही ४ महिने शिल्लक आहेत.

हे सामने पाहण्यासाठी देश- परदेशातील लोकं अहमदाबादमध्ये दाखल होतील. हे पाहता अहमदाबादमध्ये असलेल्या हॉटेल्सचे दर देखील गगनाला भिडले आहेत. एका रात्रीचे दर ५० हजारांच्याही पुढे गेले आहेत. या हॉटेल्सचे खरे दर ६,५०० ते १०,५०० इतके आहेत. (Latest sports updates)

हॉटेल्सच्या दरात वाढ का झाली?

भारत पाकिस्तान यांच्यातील हाय व्हॉल्टेज सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तर याच मैदानावर १९ नोव्हेंबर रोजी वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना देखील रंगणार आहे.

तसेच या स्पर्धेची सुरुवात देखील याच मैदानावरून होणार आहे. ५ ऑक्टोबर रोजी गतविजेते इंग्लंड आणि उपविजेते इंग्लंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे.

या स्टेडियममध्ये एकाच वेळी १ लाख ३२ हजार लोकं सामना पाहू शकतात. महत्वाचे सामने याच मैदानावर असल्याने हॉटेल व्यावसायिकांना पैसा कमवण्याची संधी चालून आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Superfoods For Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी हे 5 पदार्थ नक्की खा

NCERT Recruitment: कोणत्याही परीक्षेशविाय मिळणार NCERT मध्ये नोकरी; पगार १.४४ लाख; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Health Care : ग्लोइंग स्कीनसाठी प्या पपई स्मूदी; जाणून घ्या फायदे

महाराष्ट्राचे आमदार लंडनच्या दौऱ्यावर, कोण कोणत्या नेत्यांचा समावेश, पाहा यादी

Dashank Yog: 30 वर्षांनंतर शनी बनवणार दशांक योग; या राशींच्या तिजोरीत पडणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT