ODI World Cup 2023: वनडे वर्ल्ड कपबाबत मोठी अपडेट! मुंबई आणि कोलकाता भूषवणार उपांत्य फेरीचे यजमानपद?

ODI World Cup 2023 Latest Updates: आगामी 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारत भूषवणार आहे.
ODI World Cup 2023
ODI World Cup 2023saam tv
Published On

ODI World Cup 2023 Mumbai, Kolkata likely to host semifinals: आयसीसीच्या आगामी एकदिवसीय विश्वचषकाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सामन्यांच्या ठिकाणांविषयी समोर आलेल्या ताज्या अपडेटनुसार मुंबई आणि कोलकाता या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या आयोजन करण्‍याची शक्यता आहे. आगामी 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भारत भूषवणार आहे. ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्याचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील दोन सामन्यासाठी मुंबईचे वानखेडे आणि कोलकाताचे ईडन गार्डन स्टेडियम निवडले जाण्याची शक्यता आहे. "कोलकात्याचे ईडन गार्डन्स आणि मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे आयसीसी विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीसाठी संभाव्य ठिकाणं असल्याची माहिती सुत्रांकडून मिळ्याचे ट्वीट एएनआय या वृत्तसंस्थेने केले आहे. (Marathi Tajya Batmya)

ODI World Cup 2023
Yuvraj Singh On MS Dhoni: '2011 च्या वनडे वर्ल्ड कपनंतर धोनी बदलला..', युवराजचा मोठा गौप्यस्फोट!

मंगळवारी जाहीर होणार संपूर्ण वेळापत्रक

विशेष म्हणजे आयसीसी मंगळवारी मुंबईत एका विशेष कार्यक्रमात क्रिकेट विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करणार आहे. हा कार्यक्रम सकाळी साडेअकरा वाजता सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वेळापत्रकाचा मसुदा बीसीसीआयने आधी आयसीसीकडे पाठवला होता, त्यानंतर त्यांनी तो सहभागी मंडळांना त्यांच्या अभिप्रायासाठी पाठवला. (Latest Sports News)

ODI World Cup 2023
Team India: IPL गाजवणाऱ्या खेळाडूची लॉटरी लागली! थेट टीम इंडियात मिळणार संधी, उमेश यादवचही होणार कमबॅक

19 नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामना

मसुद्याच्या वेळापत्रकानुसार अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. अहमदाबाद येथे ५ ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने या मार्की स्पर्धेला सुरुवात होणार आहे, तर 15 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध ठिकाणी बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान हायहोल्टेज सामना होणार आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com