Yuvraj Singh: एकवेळ अशी होती जेव्हा धोनी आणि युवराजची जोडी जय वीरूची जोडी म्हणून ओळखली जायची. दोघांनी मिळून भारतीय संघाला २००७ टी -२० वर्ल्ड कप आणि २०११ वनडे वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून दिली.
मात्र २०११ वर्ल्ड कप स्पर्धा झाल्यानंतर हे दोघेही खूप कमी वेळेस एकत्र दिसून आले. मात्र आता युवराज सिंगने एमएस धोनीबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे क्रिकेट जगतात एकच चर्चा सुरु झाली आहे.
२०११ वनडे वर्ल्ड कपनंतर धोनीची वागणूक बदलली..
एमएस धोनीबाबत बोलताना युवराज सिंग म्हणाला की, '२०११ वनडे वर्ल्ड कप पर्यंत त्याचा(एमएस धोनी) माझ्यावर प्रचंड विश्वास होता. तो मला नेहमीच म्हणायचा की, तू माझा महत्वाचा खेळाडू आहेस. मात्र आजारपणातून परतल्यानंतर माझ्या खेळात बदल झाला होता. संघात अनेक बदल झाले होते. त्यामुळे जोपर्यंत २०१५ वर्ल्डकपचा विषय आहे, त्यावर खरंच तुम्ही कशावर बोट ठेवू शकत नाही. त्यामुळे तो खूप वैयक्तिक निर्णय होता. त्यावेळी मला समजलं की,कर्णधार म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही. कारण शेवटी तुम्हाला हे देखील पाहावं लागतं की देशाचा संघ कशी कामगिरी करत आहे.' (Latest sports updates)
भारतीय संघाला २००७ वनडे वर्ल्ड कप आणि २०११ वनडे वर्ल्ड कप जिंकून देण्यात युवराज सिंगने मोलाची भूमिका बजावली आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये त्याने प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला होता. मात्र २०१७ नंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम कारण्याचा निर्णय घेतला होता.
तसेच विराट कोहलीबाबत बोलताना युवराज सिंग म्हणाला की,' मी ज्यावेळी भारतीय संघात कमबॅक केले होते. त्यावेळी विराट कोहलीने मला पाठिंबा दिला होता. त्याने जर त्यावेळी पाठींबा दिला नास्ता तर मी कधीच कमबॅक करू शकलो नसतो. पण तो धोनी होता ज्याने मला जाणीव करून दिली की, निवडकर्त्यानी माझा २०१९ वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी विचार करणं बंद केलं आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.