MS Dhoni Video: भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा आपल्या चपळ यष्टिरक्षणासह आक्रमक फलंदाजीसाठी देखील ओळखला जातो. मैदानावर हेलिकॉप्टर शॉटसाठी प्रसिद्ध असलेल्या एमएस धोनीला कँडी क्रश खेळायला खूप आवडतं. याचा खुलासा एका व्हायरल व्हिडिओमधून झाला आहे.
क्रिकेटच्या मैदानात चेंडूला हेलीकॉप्टरसारखा भिरकवणारा महेंद्र दे दना दन धोनी मैदानाबाहेर कँडी क्रश खेळतो? ही बातमी त्याच्या चाहत्यांना कळताच पुढच्या ३ तासात तब्बल ३.६ मिलियन लोकांनी हा गेम डाऊनलोड केलाय आहे. त्यामुळेच कँडी क्रश सागा गेम सध्या ट्रेंडींगला आला आहे. याला कारण ठरलं आहे धोनीचा एक छोटासा हा गेम खेळतानाचा व्हिडीओ. याबाबत खुद्द कँडी क्रश सागाच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर माहीती देण्यात आली आहे. नेमका हा प्रकार काय? जाणून घ्या.
एमएसधोनीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आह. हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारणंही तस इंन्ट्रेस्टींगच आहे. एका छोट्याश्या व्हिडीओमध्ये दोन महत्वाचे इंन्सीडंट घडले आहेत.
त्यातला पहिला म्हणजे साक्षी बाजूला बसलेली असताना धोनीला एक एअरहॉस्टेस चॉकलेटची भरलेली थाळी धोनीला ऑफर करते. मात्र धोनी स्मित हास्य करत त्या थाळीतील एक चॉकलेटचे पॅकेट उचलतो. तिला धन्यवाद देत उर्वरीत चॉकलेट परत करतो. हा सगळा प्रकार धोनीची बायको साक्षी समोर सुरू असतो.
आता तुम्ही म्हणाल की यात वेगळं काय झालं? पण थांबा धोनीला चॉकलेट देणारी ती कोण आहे? आणि तिने धोनीला चॉकलेट का दिलं हे जाणून घ्या. धोनीला चॉकलेट देणाऱ्या त्या एअरहॉस्टेसचं नाव निकीता आहे.
धोनी हा निकीताचा क्रश आहे. धोनीला चॉकलेट दिल्यानंतर निकीताचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती तिच्या चेहऱ्यावरचं हसू देखील रोखू शकत नव्हती. हे आम्ही नाही तर खुद्द निकीताने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केलं आहे. (Latest sports updates)
आता या व्हिडीओमध्ये दुसरा प्रकार काय घडला ते पण पहा? एअरहॉस्टेस निकीता ज्यावेळी धोनीला चॉकलेट द्यायला येते त्यावेळी धोनी काय करतोय ते बघा? त्यावेळी धोनी चक्क कॅंडी क्रश सागा हा गेम खेळत असतो.
हा व्हिडीओ व्हायरल झाला. मग काय धोनी कॅंडी क्रश खेळतो, याबाबत त्याच्या चाहत्यांना माहीती मिळाली आणि केवळ ३ तासात कॅंडी क्रश सागा गेमचे ३.६ मिलियन डाऊनलोड्स झाले. कॅंडी क्रश गेम सध्या देशात ट्रेंडिगला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.