IPL 2025 Points Table Mumbai Indians Scenario saam tv
Sports

Mumbai Indians: चार पराभवानंतर MI ला प्लेऑफ गाठणं शक्य? कसं आहे Points Table चं समीकरण?

IPL 2025 Points Table Mumbai Indians Scenario: यंदाच्या सिझनमधील चार सामने गमावल्यानंतर टीमच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मुंबई इंडियन्स आता आयपीएलमधून बाहेर पडेल की काय अशी भीती चाहत्यांच्या मनात आहे.

Surabhi Jayashree Jagdish

यंदाच्या आयपीएल सिझनमध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झालेली नाही. आतापर्यंत मुंबईच्या टीमला केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. मुंबई इंडियन्सच्या टीमचा खेळ पाहता प्लेऑफमध्ये स्थान मिळवणं काहीसं कठीण असून चाहते मात्र आता चिंतेत आहेत. पाच वेळा आयपीएल विजेत्या टीमने पाच सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना चार पराभव पत्करावे लागले आहेत. अशातच मुंबईच्या टीमचं प्लेऑफ गाठण्याचं गणित कसं असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे.

मुंबई इंडियन्सला मिळालेला एकमेव विजय केकेआरविरुद्ध होता. जरी एमआय अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत असला तरी त्यांच्यासाठी पुढचा रस्ता अजिबात सोपा असणार नाही. चार सामने गमावल्यानंतरही एमआय प्लेऑफसाठी कशी पात्र ठरू शकते ते पाहूयात.

मुंबईसाठी प्लेऑफचे दरवाजे अजूनही खुले!

मुंबई इंडियन्ससाठी प्लेऑफचे दरवाजे अजूनही खुले आहेत. परंतु यासाठी त्यांना त्यांच्या उर्वरित सामन्यांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करावी लागणार आहे. या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सचे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २, चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध १, लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध १, राजस्थान रॉयल्सविरुद्ध १, गुजरात टायटन्सविरुद्ध १ आणि पंजाब किंग्जविरुद्ध १ सामने बाकी आहे.

याचा अर्थ मुंबई इंडियन्सचे या सिझनमधील एकूण ९ सामने शिल्लक आहेत. त्यापैकी त्यांना प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी किमान ८ सामने जिंकावे लागतील. जर मुंबईने उर्वरित ९ पैकी २ सामने गमावले तर त्यांना एकूण १६ गुण मिळवता येतील आणि त्यानंतर त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी इतर टीम्सवर अवलंबून राहावं लागू शकतं. मात्र १८ पॉईंट्सह मुंबई इंडियन्स थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकते.

मुंबईचा रस्ता कठीण

एकंदरीत गणित पाहिलं तर मुंबईसाठी प्लेऑफचा मार्ग कठीण दिसत असला तरी अशक्य आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी एमआयला पुन्हा एकदा तेच काम करावं लागणार आहे. जर एमआयने या ठिकाणाहून दोन सामनेही गमावले, तर सहावं विजेतेपद जिंकण्याचं त्यांचं स्वप्न फक्त स्वप्नच राहू शकतं. दरम्यान चांगली गोष्ट म्हणजे मुंबईला या सिझनमध्ये ९ पैकी ५ सामने वानखेडेवर खेळावे लागणार आहेत.

फलंदाजाना करावी लागणार चांगली कामगिरी

या सिझनमध्ये प्लेऑफ गाठायचं असेल तर फलंदाजांनी चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. यावेळी टीमचा माजी कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, विल जॅक्स, रायन रिकेल्टन असे फलंदाज असूनही मुंबई इंडियन्सची कामगिरी काही खास राहिलेली नाही. त्यामुळे फलंदाजांना यावेळी चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कोल्हापूर महानगर पालिका निवडणूक, जनसुराज्य शक्ती – आरपीआय – पीआरपी यांचा ‘सुराज्य संकल्प’ जाहीरनामा जाहीर

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT