IND vs WI saam tv
Sports

IND vs WI: 347 दिवसांनंतर 'या' गेमचेंजर खेळाडूची अखेर टीममध्ये एन्ट्री; पाहा वेस्ट इंडिजविरूद्ध कशी आहे प्लेईंग 11

India vs West Indies, 1st Test, Playing 11: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आणि रोमांचक बातमी! चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव जवळपास ३४७ दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर अखेर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing XI) परतला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

अहमदाबादमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टेस्ट सामना सुरू झाला आहे. या सामन्याचा टॉस पार पडला असून दोन्ही संघांनी आपापली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकला असून टीम इंडिया पहिल्यांना गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या या टेस्ट सिरीजमधून भारताने आपल्या घरच्या सिझनची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, हा सामना यंदाच्या वर्षातील भारतीय टीमचा घरी खेळला जाणारा पहिला टेस्ट सामना आहे.

टीम इंडियाने या सामन्यासाठी दमदार खेळाडू मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. टीममध्ये अनुभवी खेळाडूंसोबतच तरुण खेळाडूंनाही संधी देण्यात आलीये.

कुलदीप यादवचं अखेर कमबॅक

भारतीय टीममधील फिरकीपटू कुलदीप यादव तब्बल 11 महिन्यांनंतर टेस्ट टीममध्ये परतला आहे. त्याने शेवटचा टेस्ट सामना मागील वर्षी 16 ते 20 ऑक्टोबरदरम्यान बेंगळुरूमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तब्बल 347 दिवसांनी त्याची टेस्ट टीममध्ये पुनरागमन झालं आहे. या सामन्यात तो भारतीय प्लेइंग इलेव्हनचा महत्त्वाचा भाग ठरला आहे.

तीन स्पिनर्ससह दोन वेगवान गोलंदाज

भारतीय संघात कुलदीप यादवशिवाय आणखी दोन स्पिनर म्हणजे उपकर्णधार रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोन अनुभवी वेगवान गोलंदाजांची जोडी मैदानात उतरली आहे. त्यांना पेस ऑलराउंडर नीतीश रेड्डीचा देखील सपोर्ट आहे. ओपनिंगची जबाबदारी इंग्लंड दौऱ्याप्रमाणेच यावेळीही यशस्वी जायसवाल आणि के. एल. राहुल यांच्या खांद्यावर आहे.

वेस्ट इंडिजकडून तीन पेसर आणि दोन स्पिनर

वेस्ट इंडिजच्या टीमने या सामन्यासाठी तीन पेसर आणि दोन विशेष स्पिनर उतरवले आहेत. टीमचं नेतृत्व अनुभवी खेळाडू रोस्टन चेज करत आहेत. त्यांचा उद्देश भारतीय फलंदाजांवर दबाव आणण्याचा असणार आहे.

भारत-वेस्ट इंडिजची प्लेइंग 11

भारत

यशस्वी जायसवाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरैल, नीतीश रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.

वेस्ट इंडिज

तेजनारायण चंद्रपॉल, जॉन कॅम्पबेल, एलिक अथानाजे, ब्रेंडन किंग, शे होप, रोस्टन चेज (कर्णधार), जस्टिन ग्रीव्ह्स, जोमेल वॉरिकन, खैरी पियरे, जोहान लेन, जायडन सील्स.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalwar Upay: पैसा अन् सुख समृद्धीसाठी मंगळवारी करा हे उपाय, होईल फायदा

Mumbai School News : हातावर मेहंदी काढली म्हणून १५ ते २० मुलींना काढले वर्गाबाहेर, मुंबईतील शाळेचा धक्कदायक प्रकार!

रूग्णालयात हॅकर्सची नजर; महिलांचे खासगी व्हिडिओ लीक, हजारो क्लिप पॉxxx साईटवर अपलोड

द्राक्ष पंढरीत खळबळ! शेतकरी बागेत फिरायला गेला आणि... काही क्षणांत घेतलं विष|VIDEO

Maharashtra Live News Update: - फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

SCROLL FOR NEXT