SL vs AFG Match: Twitter
क्रीडा

SL vs AFG Match: लंकेची अफगाणिस्तानवर मात! शेवटच्या टप्प्यात तोंडचा घास हिसकावला

Vishal Gangurde

SL vs AFG Match:

आशिया कपचा सहावा सामना आज श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान असा झाला. या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानला २९२ धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तानचा सुरुवात खराब झाली. त्यानंतर अफगाणिस्तानच्या मधल्या फळीने दमदार खेळी दाखवली. मात्र, शेवटच्या टप्प्यात लंकेने अफगाणिस्तानच्या तोंडचा घास हिसकवाला आहे. (Latest Marathi News)

श्रीलंकेने दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. सलामीवर रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम जादरान लवकर बाद झाले. त्यांनी अनुक्रमे ४ आणि ७ धावा कुटल्या. दोघांना कासून राजिथाने बाद केलं.

दोघे बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानला तिसरा धक्का गुलबदीनच्या रुपाने लागला. त्याने १६ चेंडूत २२ धावा कुटल्या. गुलबदीननंतर रहमत शाह देखील बाद झाला. रहमत ४५ धावांवर बाद झाला. त्याने ४० चेंडूत ४५ धावा कुटल्या. रहमत आणि शाहिदीने चौथ्या विकेटसाठी ७१ धावांची भागिदारी रचली होती.

अफगाणिस्तानला पाचवा धक्का मोहम्मद नबीच्या रुपाने बसला. मोहम्मद नबीने ३२ चेंडूत ६५ धावा कुटल्या. नबी आणि कर्णधार शाहिदीने ८० धावांची भागिदारी रचली होती.

पुढे करीम जनत आणि शमतुल्लाह शाहिदी दोघेही एकाच षटकात बाद झाले. करीमने २२ धावा कुटल्या. तर शाहिदीने ६६ चेंडूत ५९ धावा कुटल्या. त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावला.

नजीबुल्लाह जादरानदेखील ३६ व्या षटकात बाद झाला. त्याने १५ चेंडूत २३ धावा कुटल्या. श्रीलंकेने ३८ व्या षटकात सामना फिरवला. मुजीबर उर रहमान आणि फजलहक फारूकीला बाद करून श्रीलंकेने दोन धावांनी सामना जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT