Quinton de Kock Retirement : दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड कपआधी मोठा धक्का, संघात स्थान मिळालेल्या क्विंटन डी कॉकची निवृत्तीची घोषणा

Sports News : आयसीसीने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.
Quinton de Kock
Quinton de Kock Saam TV
Published On

Quinton de Kock News :

वनडे वर्ल्डकप २०२३ सुरु होण्याआधीच दक्षिण आफ्रिका संघाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज आणि विकेटकीपर क्विंटन डिकॉकने अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. संघात स्थान मिळालं असताना देखील डिकॉकने निवृत्तीची घोषणा केल्याने सगळेच आश्चर्यचकीत झाले.

आयसीसीने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. क्विंटन डी कॉकने वर्ल्डकपनंतर वनडे फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) नेही याची पुष्टी केली आहे. (Sports News)

Quinton de Kock
World Cup 2023 Squad: मिशन 'वनडे वर्ल्डकप'साठी टीम इंडियाची घोषणा! या 15 खेळाडूंना मिळालं स्थान

क्विंटन डी कॉकची कारकीर्द

डिकॉकने 2013 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर आतापर्यंत 140 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 44.85 च्या सरासरीने आणि 96.08 च्या स्ट्राइक रेटने एकूण 5966 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 17 शतके आणि 29 अर्धशतके आहेत. 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेंच्युरियन येथे 178 सर्वाधिक धावा केल्या होत्या.

विकेटकीपर म्हणून डिकॉकने 183 कॅच आणि 14 स्टंपिंग घेतल्या आहेत. क्विंटन डिकॉक मागील दोन वनडे वर्ल्डकपचा भाग होता. ज्यामध्ये त्याने 17 सामन्यांमध्ये 30 च्या सरासरीने 450 धावा केल्या आहेत. (Latest Marathi News)

Quinton de Kock
Asia Cup 2023: ठरलं! भारत-पाकिस्तान थरार लवकरच; या दिवशी रंगणार महामुकाबला, चाहत्यांचा आनंद गगनात मावेना!

दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषक संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को यान्सन, हेनरिक क्लासेन, सिसांडा मगला, केशव महाराज, एडन मार्करम, लुंगी एनगिडी, डेव्हिड मिलर, अॅनरिक नॉर्खिया, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर डुसेने, रस्सी वॅन डर ड्यूसेन .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com