afghanistan twitter
Sports

World Cup 2023 Points Table: अफगाणिस्तानला अजुनही सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी! कसं असेल समीकरण?समजून घ्या

Afghanistan Semi Final Qualification Scenario: वाचा अफगाणिस्तानसाठी कसं असेल सेमीफायनलमध्ये जाण्याचं समीकरण.

Ankush Dhavre

Afghanistan Semi Final Qualification Scenario:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. लवकरच साखळी फेरीतील सामने संपून सेमीफायनलच्या सामन्यांना प्रारंभ होणार आहे. वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जाणारे ३ संघ ठरले आहेत. तर चौथ्या स्थानासाठी ३ संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तानसाठी वर्ल्डकप सेमीफायनलचे दार उघडे आहेत. तर ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालेला अफगाणिस्तानचा संघ अजुनही सेमीफायनलसाठी पात्र ठरु शकतो. कसं असेल समीकरण समजून घ्या.

अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात ३ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तानचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. अफगाणिस्तानने ८ पैकी ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ४ सामन्यांमध्ये अफगाणिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अफगाणिस्तानचा संघ गुणतालिकेत १० गुणांसह चौथ्या स्थानी पोहचू शकला असता. मात्र या निर्णायक सामन्यात अफगाणिस्तानला पराभव पत्कारावा लागला. या सामन्यात विजय मिळवत ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे. (Latest sports updates)

कसं असेल समीकरण..

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात जर न्यूझीलंडने विजय मिळवला. तर न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार असेल. मात्र या सामन्यात श्रीलंकेने बाजी मारली, तर अफगाणिस्तानचे सेमीफायनलमध्ये जाण्याचे मार्ग मोकळे होणार आहेत. असं झाल्यास इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवताच पाकिस्तानचा संघ १० गुणांसह सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करु शकतो.

अफगाणिस्तानसाठी कसं असेल समीकरण..

अफगाणिस्तानचा वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झालेला नाही. कारण पाकिस्तान आणि न्यूझीलंडने आपले पुढील सामने गमावले तर अफगाणिस्तानला सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे.

अफगाणिस्तानचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने पराभूत करावं लागेल. नेट रन रेटच्या बाबतीत पाकिस्तान आणि न्यूझीलंडला मागे सोडताच अफगाणिस्तानचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT