Hashmatullah Shahidi On Afghanistan Defeat twitter
Sports

AUS vs AFG: अफगाणिस्तानचं नेमकं चुकलं तरी कुठं? सामन्यानंतर कर्णधाराने सांगितलं पराभवाचं प्रमुख कारण

Hashmatullah Shahidi On Afghanistan Defeat: काय आहे अफगाणिस्तानच्या पराभवाचं नेमकं कारण?

Ankush Dhavre

Hashmatullah Shahidi Statement:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत अफगाणिस्तानला हातचा सामना गमवावा लागला आहे. एकवेळ असं वाटू लागलं होतं की, अफगाणिस्तानचा संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियाला मोठ्या फरकाने हरवणार. मात्र एकटा ग्लेन मॅक्सवेल संपूर्ण अफगाणिस्तान संघावर भारी पडला.

या सामन्यात ९१ धावांवर ऑस्ट्रेलियाचे ७ फलंदाज तंबूत परतले होते. मात्र शेवटी ग्लेन मॅक्सवेलने २०१ धावांची तुफानी खेळी करुन संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.

दरम्यान या सामन्यानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे.

हा सामना झाल्यानंतर बोलताना हशमतुल्लाह शाहिदी म्हणाला की,'हे खूप निराशाजनक आहे. आमच्यासाठी हे अविश्वसनिय होतं. आम्ही सामन्यात आघाडीवर होतो. आमच्या गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र काही हाती आलेल्या संधी आम्ही गमावल्या. त्यामुळे आमच्या अडचणी वाढल्या. आम्हाला चांगली संधी होती, त्यानंतर मॅक्सवेल काही थांबलाच नाही. मला तरी हेच वाटतं की झेल सोडणं आमच्यासाठी टर्निंग पॉईंट होता. झेल सोडल्यानंतर तर त्याने आणखी चांगला खेळ केला. त्याच्याकडे सर्व प्रकारचे शॉट्स होते त्याने माघार घेतली नाही.'

तसेच आपल्या संघातील खेळाडूंचं कौतुक करत तो म्हणाला की,'मला माझ्या संघातील गोलंदाजांचा अभिमान आहे. त्यांनी आपला सर्वोत्तम खेळ केला. आमचा संघ निराश आहे,पण हा खेळाचा एक भाग आहे. आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यात नव्या जोशात मैदानात उतरू. इब्राहीम जदरानला स्वत:चा अभिमान असायला हवा. तो वर्ल्डकप स्पर्धेत शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.' (Latest sports updates)

या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी बाद २९१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना अवघ्या ९१ धावांवर ऑस्ट्रेलियाने ७ फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेलने मिळून २०२ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने या डावात नाबाद २०१ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT