RR VS SRH  Twitter
Sports

RR vs SRH Match Result: अंतिम चेंडूवर ४ धावांची गरज अन् समदचा खणखणीत षटकार! हैदराबादचा राजस्थानवर जोरदार विजय

RR vs SRH Match Highlights: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ५२ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला

Ankush Dhavre

RR VS SRH IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ५२ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघातील फलंदाजांनी जोरदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले होते. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाने २१४ धावांचा डोंगर उभारला होता.

मात्र राजस्थानचे गोलंदाज या धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरले आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघातील फलंदाजांनी तुफान फटकेबाजी करत राजस्थान रॉयल्सवर ४ विकेट्सने विजय मिळवला आहे.

राजस्थानने केल्या २१४ धावा..

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून जोस बटलरने तुफान फटकेबाजी केली.

त्याने या डावात ५९ चेंडूंचा सामना करत ९५ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने १० चौकार आणि ४ षटकार मारले. तर कर्णधार संजू सॅमसनने ४ चौकार आणि ५ षटकारांसह ६६ धावांची खेळी केली. तर यशस्वी जयस्वालने ३५ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने २० षटक अखेर २१४ धावा केल्या होत्या.

अंतिम षटकात समदचा षटकार..

सनरायझर्स हैदराबाद संघाला विजयासाठी २१५ धावांची गरज होती. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अनमोलप्रित सिंग आणि अभिषेक शर्माने चांगली सुरुवात करून दिली होती. अनमोलप्रीत सिंगने ३३ धावांची तर अभिषेक शर्माने ५५ धावांची खेळी केली. तसेच राहुल त्रिपाठीने ४७ धावांचे योगदान दिले. शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना समदने षटकार मारून सनरायझर्स हैदराबाद संघाला जोरदार विजय मिळवला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11:

राजस्थान रॉयल्स:

यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, मुरुगन अश्विन, संदीप शर्मा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल

सनरायझर्स हैदराबाद:

अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, विव्रत शर्मा, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: पेट्रोल 45 रूपये लिटर होणार? सरकार पेट्रोलचे दर कमी करणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : ए डुबे देख; संजय राऊतांची भाजप खासदार निशिकांत दुबेंवर टीका

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी का ठेवू नयेत?

Rasgulla Recipe: मऊसूत आणि टेस्टी रसगुल्ला घरच्या घरी बनवा फक्त ३० मिनिटांत

SCROLL FOR NEXT