Aaradhya pandey karate gold medal saam tv
Sports

Aaradhya pandey: वडोदऱ्यात कराटेच्या मैदानात महाराष्ट्राची कमाल; सुवर्णपदक जिंकत आराध्या पांडेयची ऐतिहासिक कामगिरी

Aaradhya pandey karate gold medal: भारतीय खेळाडू आराध्या पांडेने आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप २०२५ मध्ये सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या विजयामुळे भारताला जागतिक स्तरावर अभिमान वाटावा अशी कामगिरी घडली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

गुजरातमधील वडोदरामध्ये असलेल्या समा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 28 ते 30 नोव्हेंबरदरम्यान झालेल्या 21व्या WKI इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप 2025 मध्ये महाराष्ट्राची उदयोन्मुख कराटेपटू आराध्या पांडेय हिने दमदार कामगिरी करत राज्याचे नाव उज्ज्वल केलंय. या चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्णपदकाला गवसणी घातलीये. वाडो-काई इंडिया (WKI) संघटनेतर्फे आयोजित ही प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा अनेक देशांतील खेळाडूंना एकाच मंचावर आणते आणि याच मंचावर महाराष्ट्रातील आराध्याने आपली चमक दाखवली.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध देशांतील खेळाडूंनी भाग घेतला. स्पर्धेत दोन प्रमुख गटांमध्ये सामने झाले. काता (Kata) ज्यामध्ये तंत्र, संतुलन आणि नियंत्रण यावर विजेता ठरतो, आणि कुमिते (Kumite) ज्यामध्ये प्रत्यक्ष सामने होऊन विजेता निवडला जातो. या दोन्ही प्रकारांमध्ये आराध्याने अप्रतिम कौशल्य दाखवले.

कुमितेमध्ये आराध्याने नेपाळच्या खेळाडूला पराभूत करून सुवर्ण पदक जिंकलं. तर कातामध्ये श्रीलंकेच्या खेळाडूला मात देत कांस्य पदक आपल्या नावे केलंय. तिचा आत्मविश्वास, वेग, तंत्र आणि संतुलन पाहून उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. फॉरमोस्ट फायटर अकॅडमीमधून निवड झालेल्या इतर विद्यार्थ्यांनीही भारताचे प्रतिनिधित्व करत विविध गटांत उत्कृष्ट कामगिरी करून पदके जिंकली आहेत.

मुख्यमंत्र्यांकडूनही कौतुकाची थाप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आराध्याचं कौतुक केलं आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिलंय की, वडोदरामध्ये झालेल्या WKI इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत महाराष्ट्राची आराध्या पांडेय हिने कुमितेमध्ये सुवर्ण आणि कातामध्ये कांस्य पदक जिंकत भारताचा झेंडा अभिमानाने उंचावला. मी तिचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्राची लेक म्हणून आम्हाला तिचा अभिमान आहे. तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

या खेळाडूंची ही कामगिरी केवळ एक विजय नाही, तर मेहनत, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवणे शक्य आहे याचा पुरावा आहे. आराध्याचे प्रशिक्षक पुरु रावल आपल्या शिष्यााच्या यशाने अत्यंत आनंदी असून आराध्या भविष्यात महाराष्ट्राला आणि देशाला अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय पदकांची भेट देईल असा विश्वास व्यक्त करतात.

आपली ही कामगिरी देशाला समर्पित करत आराध्याने सांगितलं की, ती पुढे आणखी मेहनत करून महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव जागतिक मंचावर अधिक उज्वल करणार आहे. आराध्या पांडेय आज महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी एक प्रेरणादायी नाव ठरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मुंबई महापालिकेतील महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, शिंदेसेना ९० जागा तर भाजपला १३७ जागा

Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

Pune Corporation Election: पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल; काँग्रेस-ठाकरे सेनेचं जागावाटप जाहीर

मुंबईत भीषण अपघाताचा थरार; भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, भाजपला दूर सारत राष्ट्रवादी एकत्र

SCROLL FOR NEXT