

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत झालेल्या पराभवाचा वचका भारतीय संघाने एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत घेतला. मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा १७ धावांनी दारूण पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र धावांचा डोंगर उभारल्यानंतरही टीम इंडियाला सामना वाचवण्यासाठी अखेरच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला.
रांची वनडेमध्ये अनुभवी खेळाडूंनी जबरदस्त खेळ करत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. फलंदाजीत विराट कोहली आणि रोहित शर्मा नंतर कर्णधार के एल राहुल यांनी चांगली कामगिरी केली. त्यानंतर गोलंदाजीत हर्षित राणा आणि कुलदीप यादवने शानदार खेळ करत टीम इंडियाला यश मिळवून दिलं. कुलदीपनं तीन चेंडूत दोन विकेट घेतल्यानंतर सामना भारताच्या बाजूने वळवला. कुलदीपने त्याच्या शेवटच्या षटकात चौथी विकेट घेतली.कुलदीप यादवने ६८ धावा देत ४ विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाला मोठा विजय मिळाला.
प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी जयस्वालने आपली विकेट गमावली. पण त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी एक उल्लेखनीय भागीदारी केली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना चांगलेच चोपून काढलं. त्या दोघांनी १३६ धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा ५७ धावा करून बाद झाला. पण या अर्धशतकी खेळीदरम्यान रोहितने एक मोठा विक्रम केला.
रोहितने आता एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला. पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला मागे टाकत केला आहे.रोहित बाद झाल्यानंतरही कोहलीनं आपली फटकेबाजी चालूच ठेवली. त्याने १३५ धावा केल्या. यात कोहलीने ११ चौकार आणि ७ षटकार मारले. त्यानंतर केएल राहुलने ६० धावा करत भारताला ३४९ पर्यंत पोहोचवले.
३५० धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा हर्षित राणाने डावातील दुसरे आणि त्याचे पहिले षटकात दक्षिण आफ्रिकेला दोन मोठे धक्के दिले. रायन रिकी पॉन्टिंग आणि क्विंटन डी कॉक यांनी त्यांचे बळी गमावले. हर्षितने दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात करण्यापासून रोखले. त्यानंतर पाचव्या षटकात अर्शदीपने मार्करामला बाद केले. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ७ धावांवर होता.
त्यानंतर पाचव्या षटकात मार्कराम हा अर्शदीप सिंगचा बळी ठरला. त्यानंतर जोझी आणि मॅथ्यूज यांनी एक जबरदस्त भागीदारी रचली.पण १५ व्या षटकात जोझीला कुलदीप यादवने बाद केले. त्यानंतर ब्रेव्हिसने एक दमदार खेळी केली. पण त्यानंतर जॅन्सेन आणि ब्रिएट्झके यांनी ९७ धावांची शानदार भागीदारी केली. जॅन्सेनने फक्त २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण ३३ व्या षटकात कुलदीपने जॅन्सेनला बाद करत ही भागीदारी मोडली.
भारताच्या प्रभावी गोलंदाजी सुरुवात असूनही दक्षिण आफ्रिकेने सामन्यात वर्चस्व राखलं होतं. १५ व्या षटकात चार विकेट गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने चांगली फलंदाजी केली. मार्को जॅनसेनने ३९ चेंडूत ७० धावा केल्या. जोसी आणि डेवाल्ड ब्रेव्हिसने जबरदस्त फलंदाजी करत भारताच्या विजयात अडचणी निर्माण केल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिका सहजपणे लक्ष्य पूर्ण करेल, असं वाटत होतं,
पण ३४ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या कुलदीप यादव पूर्ण सामना बदलून दिला. त्याने प्रथम जॅन्सनला बाद केले आणि नंतर ब्रिट्झकेला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. एकाच षटकात दोन विकेट घेतल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ अडचणीत आला. त्यानंतर कुलदीपनं आणखी दोन विकेट घेत आफ्रिकेला आपल्या फिरकीत अडकत भारताचा विजय सोपा केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.